लातूर येथील ज्ञानेश्वर विद्यालयात ‘भारतीय संविधान दिन’ उत्साहात

लातूर, २६ नोव्हेंबर २०२२ : लातूर येथील ज्ञानेश्वर विद्यालयात ‘भारतीय संविधान दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक वाघमारे सर यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस व भारतीय संविधाच्या प्रतीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले.

याप्रसंगी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक पेद्देवाड सर, पर्यवेक्षक मलवाडे सर, सांस्कृतिक विभागप्रमुख अनिगुंटे मॅडम, ज्येष्ठ शिक्षक क्षीरसागर, सर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारतीय संविधान ज्या दिवशी स्वीकारले गेले, तो दिवस म्हणजे २६ नोव्हेंबर. दरवर्षी हा दिवस ‘संविधान दिवस’ म्हणून साजरा केला जातो. १९४९ मध्ये या दिवशी भारतीय संसदेने अधिकृतपणे संविधानाचा स्वीकार केला. त्यानंतर २६ जानेवारी १९५० पासून देशात संविधान लागू झाले. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सलीम शेख

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा