पक्षिविश्व – धाविक (Indian Courser)

धाविक पक्षी आसाम सोडून सर्व भारतभर आढळून येतात. मराठीमध्ये धाविक / गेडरा म्हणतात.तर हिंदीमध्ये नुक्री म्हणून ओळखले जाते. हा पक्षी जमिनीवर धावत असतो, म्हणून त्याला ‘धाविक’ हे नाव मिळाले.धाविक पक्षी समूहाने आढळतात.धाविक पक्ष्याला इंग्रजीमध्ये Indian Courser म्हणतात. जवळून बघितल्यास आपल्याला या पक्षाची सुंदरता दिसून येते.

धावीक पक्षी प्रामुख्याने माळराने व खडकाळ जमिनीवर असतो. हा पक्षी आकाराने व दिसायला टिटवीसारखा आहे. त्याचा रंग तपकिरी असून, खालून तांबूस व काळा रंग असतो. गडद तांबूस डोके असून, डोळ्यांतून काळी-पांढरी पट्टी असते. त्याचे पाय लांब पांढुरके असतात. नर-मादी दिसायला सारखे असतात.

हे पक्षी निवासी व स्थानिक स्थलांतर करणारे आहेत. स्थलांतर काळात धावीक महाराष्ट्रात जीथे जीथे गवताळ माळरान, खुरटी जंगले, टेकडया आहेत त्या भागात हा आढळतो. मार्च ते ऑगस्ट या काळात त्याची वीण होते. मादी दोन ते तीन अंडी देते. उघड्या माळरान जमिनीवरच यांचे घरटे असते. वन्यजीव फोटोग्राफर तसेच पक्षी निरीक्षकांचा हा आवडता पक्षी आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा