नवी दिल्ली, ७ सप्टेंबर २०२२: सातत्याने वाढणारी महागाई , रशिया-युक्रेन युद्ध आणि निराशाजनक जागतिक आर्थिक स्थिती यांचा फारसा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होताना दिसला नाही.
अर्थव्यवस्थेकडून तसेच आर्थिक प्रणालीकडून येणारे नकारात्मक संकेत कमी होत आहेत. भांडवलाचा चांगला ओघ आणि चांगल्या गुणवत्तेचे भांडवल पर्याय यामुळे बँका तसेच बिगरबँक वित्तसंस्था यांच्या सार्वभौमत्वाला भारतात कमी धोका उरला आहे. बँका व बिगरबँक वित्तसंस्था यांची करोना काळात झालेली वित्तहानी आता भरून निघत आहे. यामुळे भारताच्या आर्थिक स्थितीला स्थैर्य प्राप्त झाले आहे.
भारतीय अर्थव्यवस्था एकीकडे बळकट होत आहे तर दुसरी कडे, सरकारच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे. दरडोई उत्पन्न अजूनही कमीच आहे. पतपुरवठयाची क्षमता कमी आहे. ही आव्हाने पेलताना अर्थव्यवस्थेला अजून मोठी पाउले उचलावी लागतील.
खासगी क्षेत्रातील वाढती गुंतवणूक, स्थिर वाटचाल आणि धोरणांची यशस्वी अंमलबजावणी या कारणामुळे जागतिक पतमानांकनात भारतीय अर्थव्यवस्थेने आपली जागा टिकवून ठेवली आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेची मूल्ये मजबूत आहेत, अर्थव्यवस्था स्थिर गतीने वाटचाल करत आहे, त्यामुळे ती करोनाच्या परिणामांतून सहीसलामत बाहेर येईल, असा विश्वास मूडीज् या पतमानांकन संस्थेने व्यक्त केला. त्यामुळे मूडीज् इन्व्हेस्टर सर्व्हिसने भारताला दिलेले ‘बीएए३’ हे पतमानांकन कायम ठेवले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : गुरूराज पोरे