इंडियन आयडलने स्पर्धक अंजली गायकवाडला दाखवला बाहेरचा रस्ता, शो सापडला वादाच्या भोवऱ्यात

मुंबई, ८ जून २०२१: इंडियन आयडल हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय संगीत शोंपैकी एक म्हणून ओळखला जातो. सध्या या शोचं १२ वं पर्व सुरु आहे. परंतु TRP च्या बाबतीत इंडियन आयडल कमालीचा मागे पडला आहे. अलिकडे काही ना काही कारणास्तव शो वादाच्या भोवर्यात सापडताना दिसतोय. शिवाय अलीकडे प्रेक्षकही या शोवर कुठल्या ना कुठल्या कारणामुळं सतत टीका करतायत.
शोच्या फॉरमेटनुसार दर आठवड्याला एक स्पर्धक एलिमिनेट केला जातो. प्रेक्षकांचं वोटिंग आणि परिक्षकांचे गुण यांची सरासरी काढून हा निर्णय घेतला जात असतो.यावेळी गायिका अंजली गायकवाड हिच्या एलिमेशनमुळं इंडियन आयडल वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
नियमाप्रमाणे ज्या स्पर्धकाला सर्वात कमी वोटिंग मिळतं त्याला शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येतो. परंतू यावर काही प्रेक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेष बाब म्हणजे या प्रकरणावर काँग्रेसचे आमदार अजय माकन यांनी सूद्धा ट्वीटर वर आपले मत व्यक्त केले.
” सध्या वेळ अत्यंत कठीण आहे.कधी कुठल्या फोन वरून काय मेसेज येईल सांगता येत नाही. काही तासांचे संगीत आपल्याला जून्या काळात घेऊन जाते. कुठलाच स्पर्धक हा इलिमिनेट होण्यासाठी आला नाही.अंजली गायकवाड तर नाहीच.तिला परत बोलवा .” अश्या आशयाचं ट्वीट अजय माकन यांनी केलं आहे.
ही काही पहीलीच वेळ नाही इंडियन आयडल या शोवर आरोप झालेत. अगदी शोचे मागील परिक्षक सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांनी इंडियन आयडल स्क्रीप्टेड असल्याचा खुलासा केला होता. शोमध्ये आलेल्या अनेक विशेष पाहुण्यांनी देखील पैसे घेऊन स्पर्धकांची स्तुती करायला सांगितलं जातं असा दावा केला आहे. अंजली गायकवाड च्या इलिमिनेशन वादावर शो च्या निर्मात्यांनी अद्याप कुठलीच प्रतिक्रीया दीलेली नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा