भारतीय ज्युनिअर हॉकी संघाने आशिया ई हॉकी स्पर्धेत मिळवले सुवर्णपदक

फलटण दि.१२जून,२०२३ : भारताच्या जुनियर महिला हॉकी संघाने इतिहास रचत ज्युनिअर हॉकी आशिया चषक स्पर्धेवरती नाव कोरले आहे दक्षिण कोरियाला धूळ चारत भारतीय ज्युनिअर हॉकी संघाने विजेतेपद पटकावले.

महिला जुनिअर हॉकी संघामध्ये फलटणच्या दोन कन्यांचा समावेश होता, त्यांच्या दमदार खेळीने भारताच्या ज्युनिअर टीमने सुवर्णपदकाला गवसणी घातली. भारताच्या महिला हॉकी ज्युनिअर संघाने दक्षिण कोरिया चा पराभव करून ही किमया साधली जपानमध्ये झालेल्या या स्पर्धेचा विजयाचा मान भारतीय महिला खेळाडूंना मिळाला . हॉकी इंडियाने घोषित केले की प्रत्येक महिला खेळाडूला दोन लाख रुपयांचे रोख बक्षीस , कर्मचाऱ्यांना एक लाख रुपयांचे रोख बक्षीस देणार असल्याचे सांगितले.
भारताच्या ज्युनिअर महिला हॉकी संघाने दक्षिण कोरिया ला २-१ असे पराजित केले विशेष म्हणजे दक्षिण कोरियाने सर्वाधिक चार वेळा ही स्पर्धा जिंकली होती आणि भारताच्या ज्युनिअर महिला हॉकी संघाने ही स्पर्धा जिंकत भारतीय संघाचे नाव कोरले.

आशियाई हॉकी ज्युनिअर स्पर्धेमध्ये भारतीय संघाने एकही सामना गमावला नाही अ गटात त्यांची कोरिया विरोधातील लढत अनिर्णीत राहिली होती त्यानंतर मलेशिया तैवान आणि उजबेकीस्थान यांचा पराभव करत गटात पहिले स्थान पटकावले उपांत्य फेरी मध्ये जपान वरती १-० असा विजय मिळवला .

भारतीय महिला हॉकी संघाने ४१ मिनिटाला डाव्या बाजूने चढाई करत भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली अखेरच्या १७ मिनिट पर्यंत भारताने आघाडी केले मात्र भारताची बचाव फळी आणि प्रयत्न केले. भारतीय महिला ज्युनिअर स्पर्धेत महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील आसू गावची कन्या वैष्णवी विठ्ठल फाळके व फलटणच्या ऋतुजा पिसाळ मिडफिल्डर चमकदार कामगिरी केली स्पर्धेत सुवर्णपदक मिळाल्याचे समजतात फलटण मध्ये जल्लोष साजरा करण्यात आला.

न्यूज अनकट प्रतिनिधी:आनंद पवार

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा