इंडियन मेडिकल असोसिएशन व बी.जे.एस. च्या वतीने फिरता दवाखाना ..!

हडपसर, दि. ६ मे २०२०: काल दि.५ एप्रिल रोजी आकाशवाणी येथील विशाल वसाहत ,डवरी वसाहत , शांती सागर वसाहत येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस माजी आमदार मोहनदादा जोशी, यांच्या प्रयत्नातून इंडियन मेडिकल असोसिएशन व भारतीय जैन संघटना (बी.जे.एस.) यांच्या वतीने व काँग्रेस पक्षाचे युवा नेते प्रशांत सुरसे व पल्लवी ताई सुरसे यांच्या माध्यमातून फिरता दवाखाना आयोजित केला.

यावेळी हडपसर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर काँग्रेस सेलचे अध्यक्ष डॉ. मंगेश वाघ, डॉ. संदीप लोंढे तसेच नगरसेवक मारुती आबा तुपे, काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस दिलीप शंकर तुपे, सामाजिक कार्यकर्ते सौ. सविता मोरे, सौ. शलाकाताई पाटील, सागर चव्हाण, सतीश जगताप, सौ. मनीषा राऊत, यांच्या सहकऱ्याने असंख्य नागरिकांची तपासणी करून घेण्यात आली व मोफत औषधे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन मा. तानाजी सकट, विशाल मित्र मंडळ, अखिल नागपंथी डवरी समाज, यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. हा कार्यक्रम समस्त नागरिकांच्या उपस्थित करण्यात आला.

न्यूज अनकट प्रतिनिधी- -ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा