पुणे, १८ सप्टेंबर २०२३ : आशियाई क्रीडा स्पर्धा सप्टेंबरपासून सुरू होत आहेत. या स्पर्धेचे आयोजन चीन करत आहे आणि हँगझोऊ ऑलिम्पिक स्पोर्ट्स एक्स्पो सेंटर हे ठिकाण म्हणून निवडले गेले आहे. क्रिकेटमधील पुरुषांचे टी-२० सामने २७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर दरम्यान, तर महिलांचे टी-२० सामने १९ ते २५ सप्टेंबर या कालावधीत होतील.
पुरुष भारतीय संघ: रुतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर) याशिवाय यश ठाकूर, साई किशोर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, साई सुदर्शन आदींना स्टैंडबाय ठेवण्यात आले आहे.
BCCI ने आशियाई क्रीडा २०२३ मध्ये महिला संघात झालेले बदल जाहीर केले आहेत. अंजली सरवानी यांच्या जागी आता पूजा वस्त्राकरने संघात स्थान मिळवले आहे. वास्तविक, गुडघ्याच्या दुखापतीमुळे अंजलीला खेळता येणार नाही.
महिला भारतीय संघ: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (डब्ल्यूके), अमनजोत कौर, देविका वैद्य, तीतस साधू, राजेश्वरी गायकवाड, मिन्नू मणी, कनिका आहुजा, उमा छेत्री यष्टिरक्षक), अनुषा बरेड्डी, पूजा वस्त्राकर यांच्यासह हरलीन देओल, कारावी गौतम, स्नेह राणा, सायका इशाक आदींना स्टैंडबायवर ठेवण्यात आले आहे.
यंदा आशियाई क्रीडा स्पर्धेत टी-२० फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळले जाणार आहे. या स्पर्धेतील कांस्य आणि सुवर्णपदकांचे सामने ७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. या मोसमात चौथे मानांकन मिळाल्याने भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशचे संघ थेट उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यांना सुरुवात करतील. इतर ११ संघ ग्रुप स्टेजमध्ये सामने खेळतील. या सर्व संघांमधील अव्वल ८ संघ नंतर उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेल्या संघांशी स्पर्धा करतील.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड