नवी दिल्ली, दि. १७ जून २०२०: चीनने पुन्हा एकदा भारताचा विश्वासघात केला आहे. पूर्वेकडील लडाखमध्ये माघार घेण्याच्या आश्वासनावरुन चीनने पलटवार करून चर्चेसाठी आलेल्या भारतीय सैनिकांवर हल्ला केला, ज्यामध्ये २० सैनिक शहीद झाले. चीनच्या सैन्याने एका विशाल षडयंत्रांतर्गत आपल्या सैनिकांवर फसव्या पद्धतीने कसा हल्ला केला ते जाणून घेऊया
वास्तविक नियंत्रण रेषेवरील (एलएसी) ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता की १५ जून रोजी बाहेरील भागात चीनी सैन्याची जमवाजमव कमी होईल. चीनी सैन्य गलवान प्रदेशातील आपल्या हद्दीत परत येईल. १६ जून रोजी भारतीय सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीपूर्वी चीनी सैन्य माघार घेईल यावर दोन्ही बाजूंनी आगाऊ सहमती दर्शविली होती.
दोन्ही देशातील सैन्य मागे सरकतील या सहमती त्यानंतर देखील चिनी सैन्यांमध्ये कोणतीही हालचाल दिसून आली नाही त्यामुळे १६ बिहार रेजिमेंटचे कर्नल संतोष बाबू यांच्या नेतृत्वात भारतीय सैन्याची छोटी तुकडी चिनी सैन्यासोबत बोलणी करण्यासाठी गेली. चर्चेदरम्यान चिनी सैन्य मागे हटण्यास तयार नव्हते ते सातत्याने या गोष्टींकडे दुर्लक्ष करत होते.
अशी माहिती आहे की यानंतर, चिनी सैन्याने भारतीय सैनिकांना वेढले आणि लाठी, दगड आणि काटेरी तारांनी त्यांच्यावर हल्ला करण्यास सुरवात केली. या चकमकीदरम्यान एका भारतीय जवानांच्या तुलनेत जागेवर ३ चिनी सैनिक होते, परंतु असे असूनही, भारतीय सैन्याने या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर असणाऱ्या सैनिकांजवळ कोणतेही हत्यार नसावे असा करार दोन्ही देशांमध्ये झाला होता. त्या अंतर्गत यावेळीसुद्धा दोन्ही सैन्याकडे बंदुका किंवा इतर युद्धसामग्री नव्हती. त्यामुळे चिनी सैनिकांनी दगड, काठ्या व काटेरी तारांचा वापर करत भारतीय सैन्यावर हल्ला केला.
सुमारे ३ तास दोन्ही बाजूने संघर्ष झाला. या चकमकीत कमांडिंग ऑफिसर संतोष बाबू यांना गंभीर दुखापत झाली. हा संघर्ष सुरू झाल्यानंतर भारतीय सैनिकांची दुसरी टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यानंतर चीनच्या या भ्याड हल्ल्याला सैन्याने प्रत्युत्तर दिले. भारतीय जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात चिनी सैनिकांचे ही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे वृत्त आहे.
वृत्तसंस्था एएनआयच्या म्हणण्यानुसार या हिंसक चकमकीत ४३ चिनी सैनिकांचा मृत्यू झाला आहे. तथापि चीनने याची खातरजमा केली नाही. दिल्लीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पूर्व लडाखच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी सीडीएस बिपिन रावत आणि तिन्ही सैन्य प्रमुखांशी बैठक घेतली. या बैठकीला परराष्ट्रमंत्री एस जयशंकर देखील उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी