भारतीय स्टार क्रिकेटपटू सुरेश रैना पोहोचला वैष्णो देवीच्या दारी

कटडा, २६ सप्टेंबर २०२०: सुरेश रैना याने यंदा सुरू असलेल्या आयपीएल २०२० मधून वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली आहे. त्याची कमतरता चेन्नई सुपर किंग्ज संघामध्ये पाहायला मिळत आहे. अशातच सुरेश रैना सोशल मीडिया वर खूप अॅक्टिव दिसून येत आहे.त्याने नुकत्याच शेअर केलेल्या पोस्ट मध्ये तो वैष्णो देवीचे दर्शन घेताना दिसून येत आहे.

काल शुक्रवार दिनांक २५ सप्टेंबर ,२०२० रोजी सुरेश रैना आधार शिविर कटडा मध्ये माँ वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी पोहोचला.इथे पोहोचताच तो सरळ भवन साठी रवाना झाला. आज शनिवार दिनांक २६ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी तो वैष्णोदेवीच्या दिव्य ज्योती आरती मध्ये तो सहभागी झाला. तसेच त्याने पूजा करत अलौकिक पिंडांचे दर्शन घेतले. त्यानंतर त्याने पैसेंजर केबल कार मध्ये बसून भैरव घाट मध्ये पोहोचल्यानंतर त्याने बाबा भैरवनाथचे दर्शन घेतले.

जम्मू – काश्मीरच्या दौऱ्यावर आलेल्या क्रिकेटर सुरेश रैना याने वैष्णोदेवीची यात्रा ११ वाजता पूर्ण करत आधार शिविर कटडा ला पुन्हा परतला. इथे त्याच्या चाहत्यांची एकच गर्दी पाहायला मिळाली . येण्याआधीच त्याला पाहण्यासाठी प्रेक्षकवर्ग गर्दी करून उभे होते. कोरोना महामारी असताना सुद्धा सुरेश रैना याने आपल्या चाहत्या वर्गाला निराश नाही केले. शारीरिक अंतराचे पालन करत त्याने आपल्या चाहत्यांसोबत फोटो काढले. आणि बहुतांश लोकांना ऑटो ग्राफ सुद्धा दिला. यानंतर तो काही वेळ कटडा मध्येच थांबला आणि नंतर जम्मूसाठी रवाना झाला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा