युक्रेनमध्ये राहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर देश सोडावा, दूतावासाने जारी केली ॲडवाइजरी

Ukraine-Russia Crisis, 21 फेब्रुवारी 2022: युक्रेनची राजधानी कीव येथील भारतीय दूतावासाने तेथे राहणाऱ्या भारतीयांसाठी एक सूचना जारी केलीय. युक्रेनमधील सध्याची परिस्थिती पाहता सर्व भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना युक्रेन सोडण्याचा सल्ला देण्यात येत असल्याचं सांगण्यात आलंय. भारतीय दूतावासाकडून असं सांगण्यात आलं आहे की, व्यावसायिक उड्डाणं आणि चार्टर उड्डाणं उपलब्ध असू शकतात.

भारतीय विद्यार्थ्यांना त्यांच्या चार्टर्ड फ्लाइट कॉन्ट्रॅक्टरच्या सतत संपर्कात राहण्याचा सल्ला दिला गेला आहे. तसंच, दूतावासाच्या फेसबुक, वेबसाइट आणि ट्विटरवरील उपडेट्स साठी संपर्कात राहण्याचं सांगण्यात आलंय.

युक्रेनमध्ये सुमारे 18 हजार भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. यातील बहुतांश विद्यार्थी तेथे वैद्यकशास्त्र शिकवण्यासाठी गेले आहेत. या लोकांनी सरकारकडं मदतीचं आवाहन केलं आहे. दरम्यान, एक महत्त्वाचा निर्णय घेत नागरी उड्डाण मंत्रालयानं भारत आणि युक्रेनदरम्यानच्या फ्लाइट्सवरील बंदी उठवली आहे.

यापूर्वी, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक नियंत्रण कक्ष तयार केला आहे आणि युक्रेनमध्ये अडकलेल्या लोकांसाठी संपर्क क्रमांक जारी केले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी हा हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. कोणाला युक्रेनमधील त्यांच्या नातेवाईकांबद्दल काही मदत किंवा माहिती हवी असल्यास, ते हेल्पलाइन क्रमांक 011-23012113, 011-23014104 आणि 011-23017905 वर कॉल करू शकतात. याशिवाय 1800118797 या टोल फ्री क्रमांकावरही कॉल करता येईल. यासोबतच भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून फॅक्स क्रमांक 011-23088124 आणि इमेल आयडी situationroom@mea.gov.in देखील देण्यात आलाय.

त्याच वेळी, युक्रेनमधून भारतात येण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी भारतीय दूतावास हेल्पलाइन क्रमांक +380 997300428, +380 99730483 आणि ईमेल आयडी cons1.kyiv@mea.gov.in देखील जारी केले आहेत. या संपर्क बिंदूंद्वारे फ्लाइट्ससह इतरांना एकत्रित केले जाऊ शकते. मंत्रालयाचे अधिकारी बागची यांनी सांगितलं की, या हेल्पलाइन 24 तास सुरू राहतील.

रशिया आणि युक्रेनमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. युद्धाचा धोका असताना संपूर्ण जगात गोंधळाचं वातावरण पाहायला मिळत आहे. आता युक्रेनमध्ये राहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांनाही भारतात परतण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ज्यांना आता युक्रेनमध्ये राहण्याची गरज नाही, त्यांना मायदेशी परतण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भारतीय दूतावासाने हे निवेदन जारी केलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा