अंडर- १९ टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा! शेफाली वर्माकडे कर्णधारपद

नवी दिल्ली, ५ डिसेंबर २०२२ : महिला अंडर १९ विश्वचषक प्रथमच आयोजित केला जात आहे. अंडर १९ विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारतीय संघाची घोषणा केली आहे. यासह दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी देखील भारतीय संघ जाहीर झाला आहे. आयसीसी अंडर १९ महिला टी-२० स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत १४ ते १९ जानेवारी २०२३ दरम्यान खेळवली जाणार आहे.

भारताला अंडर १९ मध्ये दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती आणि स्काॅटलंड सह स्थान देण्यात आले आहे. तर भारतीय संघासाठी वरिष्ठ संघात आपली प्रतिभा सिद्ध करणाऱ्या हरियाणाच्या शेफाली वर्माची संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. संपूर्ण भारतीय संघाची घोषणा ट्विटरवरून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दिली आहे.

१९ वर्षाखालील विश्वचषकासाठी भारतीय संघ :
शेफाली वर्मा (कर्णधार ), श्वेता सेहरावत (उपकर्णधार), ऋचा घोष (यष्टीरक्षक), जी त्रिशा, सौम्या तिवारी, सोनिया मेहदिया, हर्ले गाला, हर्षिता बसु, सोनम यादव, मन्नत कश्यप अर्चना देवी, पार्शवी चोप्रा, तिता साधू, फलक नाझ, शबनम एमडी.

या स्पर्धेत एकूण सोळा संघ सहभागी होणार आहेत. या संघाचे गटात रूपांतर केले आहे. भारत हा ‘ड’ गटामध्ये समाविष्ट आहे. प्रत्येक गटातील अव्वल तीन संघ सुपर सिक्स फेरीत प्रवेश करतील जिथे संघांना सहा जणांच्या दोन गटात ठेवण्यात येईल. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत जातील जे २७ जानेवारी रोजी पाॅचेस्ट्रूम येथील जे बी मार्क्स ओव्हल येथे केले जातील. तर या विश्वचषकाचा अंतिम सामना २९ जानेवारीला होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा