टी ट्वेंटी वर्ल्डकप साठी भारतीय टीम ऑस्ट्रेलियाला रवाना

मुंबई, ६ ऑक्टोबर २०२२ : ऑस्ट्रेलियामध्ये १६ ऑक्टोबर पासून टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ आज सकाळी ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे, टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये खेळणार आहे.

या संघामध्ये १४ मुख्य खेळाडू,तसेच कोच राहुल द्रविड आणि स्टाफ यांचा समावेश आहे, त्याचबरोबर राखीव खेळाडूंमध्ये मोहम्मद शमी, दिपक चहर आणि श्रेयस अय्यर यांचा समावेश आहे.

इंडियन टीमने शेवटचा टी ट्वेंटी वर्ल्डकप २००७ मध्ये जिंकला होता, तेव्हा टीमचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी होता. आता रोहित शर्मा कडून खूप अपेक्षा आहेत, त्याचबरोबर रोहितची आयसीसी स्पर्धेमध्ये संघाचे नेतृत्व करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

दरम्यान टीम इंडिया टी ट्वेंटी वर्ल्डकप अगोदर दोन सराव सामने खेळणार आहे, हे दोन्ही सराव सामने बीसीसीआयनेच आयोजित केले आहेत. पहिला सामना वेस्टन ऑस्ट्रेलिया इलेव्हन बरोबर १० ऑक्टोबरला तर दुसरा १२ ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. त्याचबरोबर भारतीय संघाला ब्रिस्बन मध्ये दोन आयसीसी सराव सामने ही खेळायचे आहेत.

तसेच टी ट्वेंटी विश्वचषकाचे सामने १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहेत. संपूर्ण स्पर्धेत भारत एकूण पाच सामने खेळणार आहे, पहिला सामना २३ ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे.

टी ट्वेंटी विश्वचषकासाठी भारतीय संघ-

रोहित शर्मा (कर्णधार), के एल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या रविचंद्र अश्विन, दीपक हुडा,दिनेश कार्तिक, हर्षल पटेल, हर्षदीप सिंग, भुवनेश्वर कुमार , चहर, अक्षर पटेल

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा