ब्लॅक टॉप पोस्टवर भारतीय सैन्याचा कब्जा, चिनी कॅमेरे व सेंसर ताब्यात

लद्दाख, १ सप्टेंबर २०२०: वास्तविक नियंत्रण रेषेवरील (एलएसी) चिनी कट उधळण्या याबरोबरच भारतीय लष्कराने ब्लॅक टॉप पोस्टही ताब्यात घेतली आहे. २९-३० ऑगस्टच्या रात्री चीनी सैन्याने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने केवळ ब्लैक टॉप पोस्ट ताब्यात घेत नाही, तर चिनी सैन्याच्या कॅमेरे आणि पाळत ठेवण्याचे उपकरणदेखील काढून टाकले आहे.

वास्तविक, चिनी सैन्य पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) ने पेंगोंग तलावाच्या दक्षिणेकडील ब्लैक टॉप पोस्ट मध्ये कॅमेरा आणि पाळत ठेवणारी यंत्रणा बसविली होती. ही पोस्ट भारतीय सैन्याने ताब्यात घेतली आहे आणि त्यात कॅमेरे आणि पाळत ठेवण्याची उपकरणे काढून टाकली आहेत.

सूत्रांनी सांगितले की ब्लॅक टॉप पोस्टवर कॅमेरे आणि पाळत ठेवण्याची यंत्रणा असतानाही भारतीय सैन्याने चिनी सैन्याला मागे ढकलले आणि रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या या पोस्ट वर भारतीय सैन्याने कब्जा केला आहे. भारतीय सैन्याने ब्लॅक टॉप पोस्टवरून कॅमेरे आणि पाळत ठेवणारी यंत्रणा काढून टाकली आहे. ही पोस्ट एलएसी वर भारतीय सीमेच्या हद्दीत येते.

सूत्रांनी सांगितले की, चीनने आपली सीमा देखरेख यंत्रणा स्वयंचलित केली असून भारतीय सैन्याच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी कॅमेरे आणि सेंसर तैनात केले आहेत. ठाकुंग भागातील उंच भागावर देखील त्यांनी ही यंत्रणा बसवली आहे. ज्याच्या माध्यमातून भारतीय हद्दीच्या बाजूला उंच भागावरील भारतीय सैन्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाते.

उंचावरील भागावर कब्जा करण्याचा चीनचा उद्देश पाहता, भारतीय सैन्य दलाच्या आणि शीख लाईट इन्फंट्रीच्या विशेष ऑपरेशन युनिटमधील जवानांसह अँटी-टँक गाईड क्षेपणास्त्रांना गेल्या आठवड्यातच डोंगराच्या उंचीवर तैनात करण्यात आले आहे. हे युनिट चिनी लोकांच्या कोणत्याही कृतीस प्रतिसाद देण्यास सक्षम आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण

लद्दाखमध्ये उभय देशांमधील २९ व ३० तारखेला झालेली चकमक पेंगोंग तलावाच्या दक्षिणेकडील एका उंच भागावरील क्षेत्रासाठी झाली होती. ब्लॅक टॉप नावाचे हे शिखर एलएसीच्या म्हणजेच भारतीय सीमेच्या बाजूने आहे, परंतु यावर कोणत्याही देशाचा आतापर्यंत कबजा नव्हता. याच भागावर चीनचा डोळा होता जो भाग आता भारतीय सैन्याने ताब्यात घेतला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा