Commonwealth Games 2022, ९ ऑगस्ट २०२२: बर्मिंगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. यावेळी भारताने या खेळांमध्ये एकूण ६१ पदके जिंकली, ज्यात २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कांस्य पदकांचा समावेश आहे. या अप्रतिम कामगिरीमुळे भारताने चौथे स्थान पटकावले. खेळाच्या शेवटच्या दिवशी भारताने चार सुवर्णांसह सहा पदके जिंकली. या चार सुवर्णांपैकी भारताने बॅडमिंटनमध्ये तीन सुवर्ण जिंकले.
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचा सुवर्णपदक विजेते:
१. मीराबाई चानू- सुवर्णपदक (वेटलिफ्टिंग ४९ किलो)
२. जेरेमी लालरिनुंगा- सुवर्णपदक (वेटलिफ्टिंग ६७ किलो)
३. अचिंता शेउली – सुवर्णपदक (७३ किलोग्रॅम वेटलिफ्टिंग)
४. महिला संघ- सुवर्णपदक (लॉन बॉल)
५. पुरुष संघ- सुवर्णपदक (टेबल टेनिस)
६. सुधीर- सुवर्ण पदक (पॅरा पॉवरलिफ्टिंग)
७. बजरंग पुनिया- सुवर्णपदक (कुस्ती ६५ किलो)
८. साक्षी मलिक- सुवर्णपदक (कुस्ती ६२ किलो)
९. दीपक पुनिया- सुवर्णपदक (कुस्ती ८६ किलो)
१०. रवी कुमार दहिया- सुवर्णपदक (कुस्ती ५७KG)
११. विनेश फोगट- सुवर्णपदक (कुस्ती ५३ किलो)
१२. नवीन कुमार- सुवर्णपदक (कुस्ती ७४ किलो)
१३. भाविना पटेल- सुवर्णपदक (पॅरा टेबल टेनिस)
१४. नीतू घनघस – सुवर्णपदक बॉक्सिंग)
१५. अमित पंघल- सुवर्णपदक (बॉक्सिंग)
१६. अल्धॉस पॉल – सुवर्ण पदक (तिहेरी उडी)
१७. निखत जरीन- सुवर्णपदक (बॉक्सिंग)
१८. अचंत आणि श्रीजा अकुला- सुवर्णपदक (टेबल टेनिस)
१९. पीव्ही सिंधू- सुवर्णपदक (बॅडमिंटन)
२०. लक्ष्य सेन- सुवर्णपदक (बॅडमिंटन)
२१. सात्विक आणि चिराग- सुवर्णपदक (बॅडमिंटन)
२२. अचंत शरथ कमल – सुवर्णपदक (टेबल टेनिस)
पदकतालिकेत भारत चौथ्या क्रमांकावर
११व्या दिवशी भारताला एकूण सहा पदके मिळाली, ज्यामुळे भारतीय संघाने न्यूझीलंडवर चौथे स्थान पटकावले.भारताच्या खात्यात २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कांस्य पदके आहेत. ऑस्ट्रेलियाने ६७ सुवर्ण, ५७ रौप्य आणि ५४ कांस्य पदकांसह पदकतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. दुसरीकडे, यजमान इंग्लंडने ५७ सुवर्ण पदकांसह दुसरे तर कॅनडाने २६ सुवर्ण पदकांसह तिसरे स्थान पटकावले. न्यूझीलंड १९ सुवर्ण पदकांसह पाचव्या क्रमांकावर आहे.
कॉमनवेल्थमधील रौप्य पदक विजेत्यांची यादी:
१. संकेत महादेव- रौप्य पदक (वेटलिफ्टिंग ५५ किलो)
२. बिंदियाराणी देवी – रौप्य पदक (वेटलिफ्टिंग ५५ किलो)
३. सुशीला देवी – रौप्य पदक (जुडो ४८ किलो)
४. विकास ठाकूर – रौप्य पदक (वेटलिफ्टिंग ९६ किलो)
५. मिश्र संघ – रौप्य पदक (बॅडमिंटन)
६. तुलिका मान – रौप्य पदक (जुडो)
७. मुरली श्रीशंकर- रौप्य पदक (लांब उडी)
८. अंशू मलिक – रौप्य पदक (कुस्ती ५७ किलो)
९. प्रियांका गोस्वामी – रौप्य पदक (१० किमी चालणे)
१०. अविनाश साबळे – रौप्य पदक (स्टीपलचेस)
११. पुरुष संघ – रौप्य पदक (लॉन बॉल)
१२. अब्दुल्ला अबुबकर- रौप्य पदक (तिहेरी उडी)
१३. अचंत आणि जी. साथियान – रौप्य पदक (टेबल टेनिस)
१४.सागर अहलावत- रौप्य पदक (बॉक्सिंग)
१५. महिला संघ – रौप्य पदक (क्रिकेट)
१६. भारतीय पुरुष संघ – रौप्य पदक (हॉकी)
कांस्यपदक विजेत्यांची यादी:
१. गुरुराजा- कांस्य पदक (वेटलिफ्टिंग ६१ किलो)
२. विजय कुमार यादव – कांस्य पदक (जुडो ६० किलो)
३. हरजिंदर कौर- कांस्य पदक (वेटलिफ्टिंग ७१KG)
४. लवप्रीत सिंग – कांस्य पदक (वेटलिफ्टिंग १०९ किलो)
५. सौरव घोषाल – कांस्य पदक (स्क्वॉश)
६. गुरदीप सिंग – कांस्य पदक (वेटलिफ्टिंग १०९+ केजी)
७. तेजस्वीन शंकर- कांस्य पदक (उंच उडी)
८. दिव्या काकरन – कांस्य पदक (कुस्ती ६८ किलो)
९. मोहित ग्रेवाल – कांस्य पदक (कुस्ती १२५ किलो)
१०. जास्मिन लॅम्बोरिया – कांस्य पदक (बॉक्सिंग)
११. पूजा गेहलोत – कांस्य पदक (कुस्ती ५० किलो)
१२. पूजा सिहाग- कांस्य पदक (कुस्ती)
१३. मोहम्मद हुसामुद्दीन – कांस्य पदक (बॉक्सिंग)
१४. दीपक नेहरा- कांस्य पदक (९७ KG कुस्ती)
१५. सोनलबेन पटेल – कांस्य पदक (पॅरा टेबल टेनिस)
१६. रोहित टोकस- कांस्य पदक (बॉक्सिंग)
१७. भारतीय महिला संघ- कांस्य पदक (हॉकी)
१८. संदीप कुमार – कांस्य पदक (१० किमी चालणे)
१९. अन्नू राणी – कांस्य पदक (भालाफेक)
२०. सौरव आणि दीपिका पल्लीकल – कांस्य पदक (स्क्वॉश)
२१. किदाम्बी श्रीकांत – कांस्य पदक (बॅडमिंटन)
२२. गायत्री आणि त्रिशा जॉली – कांस्य (बॅडमिंटन)
२३. जी. साथियां – कांस्य पदक (टेबल टेनिस)
भारतीय संघाने कुस्तीत सर्वाधिक पदके मिळवली
२०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला कुस्तीत सर्वाधिक पदके मिळाली. भारतीय कुस्तीपटूंनी कुस्तीमध्ये १२ पदके जिंकली, ज्यात सहा सुवर्ण, एक रौप्य आणि पाच कांस्य पदकांचा समावेश आहे. यानंतर या यादीत वेटलिफ्टिंगचा क्रमांक येतो जिथे भारताच्या खात्यात १० पदके आली. याशिवाय भारताला बॉक्सिंगमध्ये तीन सुवर्णांसह ७ पदके मिळाली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे