ऑस्ट्रेलिया विरुद्ध आजच्या सामन्यात भारताची ‘करो या मरो’ स्थिती

नागपूर, २३ सप्टेंबर २०२२ :भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी ट्वेंटी मालिकेतील दुसरा सामना आज शुक्रवारी नागपुरात होणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोहालीतील लढतीत मोठी धावसंख्या २०८ उभारल्यानंतरही ढिसाल क्षेत्ररक्षण आणि ‘डेट्स ओवर्स’ मधील खराब कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध च्या पहिल्या टी-ट्वेंटी सामन्यात मंगळवारी भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते.

या सामन्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांवर बरीच टीका झाली. या पार्श्वभूमीवर भारतीय संघ दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात आज शुक्रवारी ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. आज नागपूरात होणाऱ्या या सामन्यावर पावसाचे सावट आहे. नव्या योजना सह भारत विजय मिळवेल अशी आशा आहे. आजचा सामना भारतीय संघासाठी ‘करो किंवा मरो’ अशा स्वरूपाचा असेल. भारतीय संघाने आजचा सामना गमावला तर मालिका ऑस्ट्रेलियाच्या नावावर होईल. परंतु भारतीय संघ विजयी ठरला तर मालिका बरोबरीत येईल.

आजच्या टी ट्वेंटी सामन्यासाठी टीम इंडिया मध्ये अचानकपणे सर्वात मोठ्या सामना विजेत्याचे पुनरागमन झालेले आहे, सूर्यकुमार यादवने नागपूर सामन्या आधी पत्रकार परिषदेत बोलताना प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराच्या तंदुरुस्ती बद्दलमाहिती दिली आहे. जसप्रीत च्या तंदुरुस्ती बद्दल मोठी अपडेट देत सूर्यकुमार यादव ने सांगितले की तो दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यास खेळण्यासाठी तयार आहे.

नागपूर मध्ये आज पावसाची शक्‍यता आहे. पण सामना रद्द होईल एवढा जोरदार पाऊस मात्र नसेल असे म्हटले जात आहे. आजचा हा सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा