२०८ धावा करूनही भारताचा लाजिरवाणा पराभव

पुणे, २१ सप्टेंबर २०२२: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्याचे टी ट्वेंटी मालिकेतील पहिला सामना मोहाली येथे खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने २०८ धावा केल्या परंतु तरीही रोहित शर्माच्या, नेतृत्वाखालील संघाला दारून पराभवाला सामोरे जावे लागले.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फींचने, नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आणि भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी बोलावलं. भारतीय संघासाठी रोहित शर्मा व केएल राहुल यांनी सलामी दिली. रोहित ने दुसऱ्या षटकात कमिन्स याला एक षटकार व एक चौकार ठोकत चांगली सुरुवात केली. मात्र तिसऱ्या षटकात तो बाद झाला. त्याने ९ चेंडूत ११ धावा केल्या.नंतर राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी सुरुवातीच्या पडझडीनंतर तिसऱ्या विकेटसाठी ३१चेंडूत ५१ धावांची अर्धेशतकीय भागीदारी केली. राहुलने ५५धावा केल्या तर सूर्यकुमार यादवने २५ चेंडूत ४६ धावा केल्या.हार्दिक पांड्याच्या, झंझावती अर्धशतकामुळे भारतीय संघाने निर्धारित २० षटकात २०८ धावा केल्या.

या धावाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने आक्रमक सुरुवात केली. फिंच ने दुसऱ्या षटकात तब्बल चार चौकार लगावले. पण त्यानंतर अक्षर पटेल ने फिंच ला बाद केले आणि ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला, पण त्यानंतर कॅमरून ग्रीन, व स्मिथ यांची चांगलीच भागीदारी रंगली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकीय भागीदारी रचली, वेड आणि टीम डेविड या दोघांच्या झुंजार खेळीने अखेरपर्यंत हार न मानता चार गडी राखून भारतावर विजय संपादन केला.

ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २०९ धावांचं लक्ष होतं. हे ऑस्ट्रेलियन संघाने १९.२ षटकात ६ गडी गमावून पूर्ण केले आणि ४ विकेट ने सामना जिंकला.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा