१९८० ला संजय गांधी यांचा एका विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. तोपर्यंत राजीव गांधी हे राजकारणापासून चार हात दूरच राहत व जाहीरपणे सांगितले होते की मी सक्रिय राजकारणात येणार नाही. १९६८ मध्ये शिक्षण पूर्ण करून आल्यानंतर एअर इंडियामध्ये ते पायलट म्हणून रुजू झाले. त्यावेळी आई श्रीमती इंदिरा गांधी या भारताच्या पंतप्रधान होत्या. संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर आई व काँग्रेस कमिटी यांच्याकडून सातत्याने सक्रिय राजकारणात येण्याचा दबाव वाढत होता,राजीव गांधींनी विचार बदलून सक्रिय राजकारणात येण्याचा निर्णय घेतला १९८१ साली गांधी घराण्याचा पारंपारिक लोकसभा मतदारसंघ अमेठीतून निवडणूक लढवून त्या वेळी जवळपास दोन लाखाच्या मताधिक्क्याने राजीव गांधी लोकसभेवर निवडून गेले व काँग्रेस कमिटीने अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्षपद बहाल केले.
३१ ऑक्टोबर १९८४ ला देशाच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची अंगरक्षका कडूनच हत्या झाली, काँग्रेसने त्यांना पंतप्रधानपदी विराजमान केले त्यावेळी त्यांचे वय 40 वर्षे व भारतीय राजकारणातील सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.शपथ घेतल्याबरोबर त्यांनी लोकसभा बरखास्त करून नव्याने निवडणुका घेतल्या व त्यात काँग्रेस पक्षाचे ४११ खासदार लोकसभेवर निवडून आणले व एक हाती सत्ता स्थापन केली.
राजीवजीनी डिजिटल भारत करण्याचे स्वप्न पाहिले व ते सत्यात उतरवण्याचे काम ही चालू केले श्री राजीव गांधींनी माहिती तंत्रज्ञान व दूरध्वनी क्षेत्रासंबंधी क्रांतिकारी निर्णय घेतले स्वतःच्या अधिपत्याखाली ऑगस्ट १९८४ ला ( सेंटर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स ) ची स्थापना करून प्रत्येक खेडेगावात पर्यंत दूरध्वनी पोहोचवण्याचे व सुधारणा करण्याचे काम चालू केले, त्यावेळी राजीवजी म्हणत की देशातील प्रत्येक व्यक्तीकडे फोन असेल अशा दूरदृष्टीचे नेते होते.
आज आपली लोकडोवन च्या काळात स्मार्टफोन ने करमणूक होते ही त्यांनी पाहिलेल्या स्वप्नामुळेच. देशात साक्षरतेचे प्रमाण अत्यंत कमी असताना राजीवजी संगणकीकरणाची भाषा बोलत असत त्यामुळे संगणकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या त्यावेळेच्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर कर सवलत व आयात शुल्क कमी केले. भारतीय रेल्वे मध्ये संगणकांचा वापर त्यांनी चालू करून भारतामध्ये पहिल्यांदा संगणकीय रेल्वे आरक्षण तिकीट चालू केले त्याच बरोबर पंचायत राज ची सुरुवात त्यांनीच करून गाव पातळीवर निर्णय व काम करण्याचा मार्ग मोकळा केला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मतदानाचा अधिकार हा वय वर्षे २१ वरून १८ वरती आणण्याचा निर्णय घेतला. जो आज डिजिटल इंडिया उभा आहे तो त्यांनी केलेल्या कामाच्या पायाभरणी वरच.
यशाच्या शिखरावर असताना त्यांना अपयशालाही तोंड द्यावे लागले १९८८ मध्ये बोफोर्स प्रकरणात विरोधकांनी मोठे रान उठवले, राजीव गांधी यांची प्रतिमा मलिन केली गेली या गोष्टीची परिणीती म्हणून १९८९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत अखिल भारतीय काँग्रेस पक्षाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले व राजीवजींना पंतप्रधान पद सोडावे लागले. इंदिराजी व राजीव राजीव गांधी यांच्या राजकारणात फरक होता इंदिराजींने फुटीरवाद्यांना मदत करण्याचे धोरण अवलंबिले होते ते राजीव गांधी थांबून पहात होते. श्रीलंकेत शांतिसेना पाठविण्याचा निर्णय त्यामुळेच घेतला, जर श्रीलंकेत त्यांना मदत केली गेली तर आपण काश्मीर प्रश्नावर आपल्याला अंतर राष्ट्रीय पातळीवर बोलता येणार नाही व प्रभाकरन ( लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईल्म) चा प्रमुख शास्त्र खाली ठेवून अंतर्गत स्वायत्तता स्वीकारावी शांतिसेना ही श्रीलंकेत शांतता स्थापन करण्यासाठी गेली होती सेने ही ना सिहाली च्या बाजूने होती न तमिळींच्या १९८७ ते ९० पर्यंत सेना तैनात होती पण शेवटी लिट्टे बरोबरच युद्ध करावे लागले सेना श्रीलंकेत पाठवली.
या गोष्टीचा मनात राग धरून लिट्टेने २१ मे १९९१ रोजी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तमिळनाडूतील श्री पेरूबत्तुर बुदुर या गावी मानवी बॉम्बने राजीव गांधींची दुर्दैवी हत्या करण्यात आली.
अशोक कांबळे.