भारताच्या मोस्ट वांटेड दाऊद इब्राहिमचा पुतण्या सिराज कासकरचे कोरोनाने निधन

मुंबई, २६ डिसेंबर २०२०: भारताच्या मोस्ट वांटेड दाऊद इब्राहिमचा पुतण्या सिराज कासकर याचे पाकिस्तानमधील कराची येथे निधन झाले. तो कोरोना पॉझिटिव्ह झाला होता. आठवड्या भरापासून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, तो वाचू शकला नाही. मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ३८ वर्षीय मृतक सिराज कासकर दाऊद इब्राहिमचा मोठा भाऊ साबिर कासकरचा मुलगा होता.

तत्पूर्वी, साबिर कासकर हा मुंबईतील दाऊदच्या टोळीचे नेतृत्व करीत होता. पण, पठाण टोळीच्या आदेशानुसार १२ फेब्रुवारी १९८१ रोजी त्याला गुंड मन्या सुर्वे यानी गोळ्या घालून ठार केले होते. या हत्याकांडानंतर मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू झाली. या टोळीयुद्धानंतर दाऊद इब्राहिम मुंबई अंडरवर्ल्डचा डॉन बनला.

मुंबई गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितले की, त्यांना त्यांच्या खबऱ्यांकडून समजले की साबिर कासकर यांचा मुलगा सिराज यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या आठवड्यात त्याला श्वास घेण्यात त्रास झाला. त्यानंतर त्याला कराचीच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. नंतर, जेव्हा त्यांची प्रकृती खालावली तेव्हा त्याला लाइफ सपोर्ट देण्यात आला.

बुधवारी सकाळी दोन दिवस लाइफ सपोर्ट घेत सिराजची प्रकृती बिघडली. सिराजची नाडी कमी होतच राहिली आणि मग ऑक्सिजनच्या अभावामुळे त्याच्या शरीरावरचे अनेक भाग निकामी झाले, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा