भारताचा दक्षिण आफ्रिकेवर ८ विकेट्सने दणदणीत विजय,

पुणे, २९ सप्टेंबर २०२२ : टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ३ टी ट्वेंटी मॅचेसच्या सिरीजमधील काल पहिली मॅच झाली. ही मॅच टीम इंडियाने ८ विकेट्सने जिंकत सिरीजमध्ये १-० ने आघाडी घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी १०७ धावांचं लक्ष दिलं होतं. टीम इंडियाने २० चेंडू राखत आरामात हे लक्ष पार केलं. केएल राहुल नाबाद ५१ आणि सूर्यकुमार यादव नाबाद ५० धावा केल्या.

टीम इंडियाने टॉस जिंकून फील्डिंगचा निर्णय घेतला त्यानंतर दीपक चहर व हर्षदीप सिंग यांनी अवघ्या २.३ षटकात दक्षिण आफ्रिकेचे पहिले पाच गडी बाद केले. एडम माक्रम व वेन पार्नेल यांनी संघाचा डाव सावरला. त्यानंतर आलेल्या केशव महाराजने ४१ धावा करत संघाला शंभरी पार करून दिली. त्यांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर १०६ धावांचं आव्हानात्मक लक्ष ठेवलं. टीम इंडिया कडून हर्षदीप सिंग यांनी सर्वाधिक म्हणजे ३ विकेट्स घेतल्या तर दीपक चहर आणि हर्षल पटेल या दोघांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या.

विजयासाठी मिळालेल्या १०७ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला देखील चांगली सुरुवात मिळाली नाही. कर्णधार रोहित शर्मा खातेही न खोलता तंबूत परतला अनुभवी विराट कोहली यांच्याकडून अपेक्षा होत्या मात्र तो देखील ३ धावांच्या पुढे जाऊ शकला नाही. यानंतर सूर्यकुमार यादव आणि के एल राहुल या जोडीने टीम इंडियाला विजय मिळवून दिला. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी नाबाद ९३ धावांची विजयी भागीदारी केली. टीम इंडियाकडून राहुल यांनी ५१ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर सूर्यकुमार यादव ने ३३ बॉलमध्ये नाबत ५० धावा केल्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा