भारतातील रस्त्यांचे जाळे अमेरिकेनंतर जगात दुसऱ्या क्रमांकावर

21

नवी दिल्ली २८ जून २०२३: गेल्या ९ वर्षांत भारतातील रस्त्यांचे नेटवर्क ५९% वाढले आहे. आता रस्त्यांच्या जाळ्याच्या बाबतीतही भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश बनला असुन भारतातील रस्त्यांचे जाळे आता १,४५,२४० किलोमीटर झाले आहे, जे २०१३-१४ मध्ये ९१,२८७ किलोमीटर होते. अशी माहिती परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात दिली.

नितीन गडकरी पुढे म्हणाले की, गेल्या ९ वर्षांत भारताने रस्ते क्षेत्रात ७ जागतिक विक्रम केले आहेत. आज भारतीय रस्त्यांचे जाळे अमेरिकेनंतर जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहे. रस्ते टोलमधून मिळणारा महसूल आता ४१,३४२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो २०१३-१४ मध्ये ४७७० कोटी रुपये होता. २०३० पर्यंत टोल महसूल १.३ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.

FASTag च्या वापरामुळे टोल प्लाझावरील प्रतीक्षा वेळ ४७ सेकंदांनी कमी करण्यात मदत झाली असुन ते ३० सेकंदांपेक्षा कमी करण्यासाठी सरकार अनेक उपाययोजना करत आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीत, ‘सरकारच्या ९ वर्षांची कामगिरी’ या विषयावरील परिषदेत बोलताना ही सगळी माहिती दिली.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा