बुमराहनंतर हा भारताचा दुसरा खतरनाक गोलंदाज, माजी कप्तानाचे वक्तव्य

7

कोलकाता २२ जानेवारी २०२५ : भारताचे माजी क्रिकेटर सौरभ गांगुली यांनी अशा वेगवान गोलंदाजाबद्दल सांगितलॆ आहे, ज्या गोलंदाजाला तो बुमराह नंतर दुसरा सर्वात खतरनाक गोलंदाज मानतो. बुमराह जगातील सर्वात वेगवान आणि खतरनाक गोलंदाज आहेच, पण त्यानंतर असा दुसरा कोणता गोलंदाज आहे त्याबाबद्दल तुम्हाला प्रश्न पडला असेलच ते आम्ही तुम्हाला सांगतो. टीम इंडियाचे माजी क्रिकेटर सौरभ गांगुलीने मोहम्मद सिराज नाही तर मोहम्मद शमीला जसप्रीत बुमराहनंतर दुसरा सर्वात खतरनाक गोलंदाज म्हटले आहे. कोलकाता येथे एका खाजगी कार्यक्रमात सौरभ गांगुली प्रसार माध्यमांसमोर बोलत होते.

सौरभ गांगुली म्हणाले की, “शमीला तंदुरुस्त पाहून मला खूप आनंद झाला कारण मला वाटते की जसप्रीत बुमराह नंतर देशातील सर्वोत्तम गोलंदाज तो आहे. त्याचा खेळ खराब होत चालला असून त्यामागचे कारण त्याच्या गुडघ्याला झालेली दुखापत आहे.” पण वास्तविक एक चांगली गोष्ट अशी की, त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालसाठी मोठ्या प्रमाणात गोलंदाजी केली आहे, ज्यामुळे येणाऱ्या सामन्यांत त्याला मदत होणार आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीत टीम इंडियाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी भारतीय संघाच्या कामगिरीवर चाहत्यांकडून सतत टीका होऊ लागल्या. यातच सौरभ गांगुलीने कोणालाही टार्गेट न करता संघाच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित केले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रथमेश पाटणकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा