चेन्नई, दि. २५ जून २०२०: युवा भारतीय ग्रँडमास्टर आर वैशालीने फिडचेस डॉट कॉमच्या महिला वेगवान बुद्धीबळ स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात माजी विश्वविजेत्या अँटोनेटा स्टीफानोव्हाला अटीतटीची झुंज दिली पण अव्वल खेळाडू कोनेरू हम्पी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. चेन्नईत राहणाऱ्या वैशालीची उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मंगोलियाचे आंतरराष्ट्रीय मास्टर मुंखजुल तुरमुंख यांच्याशी सामना होईल.
बल्गेरियातील प्रतिस्पर्ध्याविरुद्ध वैशालीने ६-५ असा विजय मिळवला. यापूर्वी तिने पात्रता टप्प्यात व्हॅलेन्टीना गुणिना आणि एलेना काशालिन्स्काया या बलाढ्य खेळाडूंचा पराभव केला होता. परंतु, गतविजेत्या जागतिक रॅपीड चॅम्पियन हंपीला पहिल्या टप्प्यात व्हिएतनामच्या प्रतिस्पर्धी ली थाओ नुगुयेन फामकडून ४.५ – ५.५ असा पराभव पत्करावा लागला. दरम्यान, वैशालीने स्टीफानोवावरील विजयाबद्दल आनंद व्यक्त केला.
“माजी विश्वविजेतेपदाचा सामना करणे आणि जिंकणे हा एक चांगला अनुभव होता,” असे तिने एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. पहिल्या तासानंतर मी ५.५ – २.५ वर आघाडी घेत होते, परंतू इंटरनेट कनेक्शन खराब झाल्यामुळे मला थोडा वेळ गमवायला लागला, ज्यामुळे माझे नुकसान झाले. ”
वैशाली, चेन्नईची रहिवासी आहे आणि ती बुद्धिबळपटू आर. प्रगणानंद यांची बहीण आहे. २०१७ मध्ये तिने एशियन ब्लीटझ चॅम्पियनशिप जिंकला.
न्यूज अनकट प्रतिनिधी