स्वदेशी तेजस फायटर जेट होणार आणखी प्रगत, हे होणार बदल

नवी दिल्ली, २ फेब्रुवरी २०२१: भारताच्या वायू शक्ती मध्ये आणखी भर पडणार आहे. स्वदेशी मल्टीरोल कॉम्बॅट फाइटर जेट तेजस मार्क -२ बनवण्यास सुरुवात केली जाणार आहे. त्यानंतर, वर्ष २०२३ मध्ये याच्या हाय स्पीड टेस्ट घेण्यात येतील. हे लढाऊ विमान बनविणारी कंपनी हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आरआर यांनी ही माहिती दिली आहे.

माधवन म्हणाले की, सन २०२५ पर्यंत एचएएल तेजस मार्क -२ चे उत्पादन सुरू होईल. तेजसच्या या अपग्रेड केलेल्या आवृत्तीत अधिक इंधन, अधिक रेंज, अधिक वजन उचलण्याची क्षमता, अधिक इंजिन पॉवर आणि सुपरिअर नेट सेंट्रीक वॉर फेअर सिस्टम असेल. जास्त वजन आणि रेंजमुळे ते मार्क -१ एपेक्षा उत्कृष्ट होईल.

माधवन यांनी सांगितले की, भारतीय वायुसेनेने एचएएलबरोबर ७३ तेजस मार्क -१ ए साठी ४८ हजार कोटींचा करार केला होता. तेजस मार्क -२ बनवण्याची प्रक्रिया ऑगस्ट किंवा सप्टेंबर २०२२ मध्ये सुरू केली जाईल. २०२३ मध्ये हाय स्पीड ट्रायल आणि २०२५ मध्ये उत्पादन केले जाईल.

नेक्स्ट जनरेशन मल्टि रोल कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एएमसीए) प्रकल्पासंदर्भात माधवन म्हणाले की, त्यात खासगी क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश करण्याची योजना आहे. भारत पाचव्या पिढीचे ( फी जनरेशन) मध्यम वजन असणारे डिप पेनेट्रेशन फायटर जेट विमान बनवित आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ५ बिलियन डॉलर्स म्हणजेच ३६,४२८ कोटी रुपये खर्च येणार आहेत.

२०२६ पर्यंत पाचव्या पिढीतील मध्यम वजनाचा डीप पेनेट्रेशन फायटर जेटचा नमुना तयार केला जाईल. २०३० मध्ये त्याचे उत्पादन सुरू होईल. संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ) सध्या या प्रकल्पात कार्यरत आहे. एकदा त्यांच्या वतीने गोष्टी निश्चित झाल्यावर एचएएल त्यावर काम करण्यास सुरवात करेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा