इंदोर येथे रंगणार आज भारत-श्रीलंका दुसरा क्रिकेट सामना

37

नवी दिल्ली : भारत विरुद्ध श्रीलंका पहिला सामना पावसामुळं रद्द करण्यात आला होता. त्यानंतर इंदोर येथे आज काही तासात दुसरा टी २० सामना होळकर स्टेडियमवर होणार आहे.
या सामन्याचे प्रक्षेपण सायंकाळी ७ वाजल्यापासून सुरू होणार आहे. याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स या वाहिनीवरून होईल. तर लाइव्ह स्ट्रिमिंग हॉटस्टारवर पाहता येईल.

भारतीय संघात विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, संजू सॅमसन, ऋषभ पंत, शिवम दुबे, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर इ.

दरम्यान, ३ सामन्यांच्या या मालिकेतील तिसरा व अंतिम सामना १० जानेवारीला पुण्यात होणार आहे.