गोल पोस्ट राष्ट्रीय इंदौर : रस्त्यावरील चालत्या ट्रकला अचानक भीषण आग

इंदौर : रस्त्यावरील चालत्या ट्रकला अचानक भीषण आग

इंदौर, १६ फेब्रुवारी २०२३ :मध्य प्रदेशातील इंदौर जिल्ह्यात मुंबई-दिल्ली महामार्गावर एका ट्रकला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग इतकी भीषण होती की, त्याच्या ज्वाळा बायपासच्या दोन्ही बाजूंना पोहोचत होत्या. त्यामुळे वाहतूकही ठप्प झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, इंदौर बायपासवर बुधवारी रात्री एका ट्रकला फिनिक्स सिटाडेल मॉलजवळ आग लागली.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या उपनिरीक्षकाने सांगितले की, रस्त्यावरून जात असताना ट्रकमधील स्पार्किंगमुळे इंजिनला आग लागली असल्याची प्राथमिक माहिती असून, तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले आणि आग आटोक्यात आणण्यात आली आहे.

दरम्यान, ट्रक चालकास उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून, त्याची प्रकृती स्थिर आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

error: Content is protected !!
Exit mobile version