इंदोर ठरले भारतातील सर्वात स्वच्छ शहर

नवी दिल्ली, २० ऑगस्ट २०२०: केंद्र सरकारने गुरुवारी स्वच्छता सर्वेक्षणातील पाचव्या आवृत्ती ‘स्वच्छ सर्वेक्षण – २०२०’ चा निकाल जाहीर केला. इंदोरला सलग चौथ्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहराचा मान मिळाला आहे . यापूर्वी इंदोरने २०१७, २०१८, २०१९ मध्ये अव्वल स्थान मिळविले होते. दुसर्‍या क्रमांकावर गुजरातचे सुरत असून तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रात नवी मुंबई आहे. सर्वात स्वच्छ शहर पुरस्कार पहिल्या वर्षी म्हणजे २०१६ सली कर्नाटकातील म्हैसूरने जिंकला.

स्वच्छतेच्या सर्वेक्षणात पुन्हा एकदा इंदोरचा पहिला क्रमांक लागल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान म्हणाले की, स्वच्छता इंदोरचे स्वरूप आहे, इथल्या लोकांनी घाण काढून टाकली आहे आणि स्वच्छता इंदोरची सभ्यता बनली आहे. मी इंदोरच्या जनतेचे अभिनंदन करतो. आता केवळ देशातूनच नाही तर जगातूनही लोक स्वच्छतेचा धडा घेण्यासाठी आणि शिकण्यासाठी इंदोरला येतात.

स्वच्छ शहरांची क्रमवारी

१. इंदोर (मध्य प्रदेश)
२. सुरत (गुजरात)
३. नवी मुंबई (महाराष्ट्र)
४. अंबिकापूर (छत्तिसगढ)
५. म्हैसूर (कर्नाटक)
६. विजयवाडा (आंध्रप्रदेश)
७. अहमदाबाद (गुजरात)
८. नवी दिल्ली (दिल्ली)
९. चंद्रपूर (महाराष्ट्र)
१०. खारगोने (मध्य प्रदेश)

केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी या सर्व्हेचा निकाल जाहीर केला. “काही वर्षांपूर्वी मी जपानी शिष्टमंडळाच्या सदस्यासह इंदोरला गेलो होतो. जेव्हा आम्ही शहरात पोहोचलो तेव्हा मी पाहिले की ते इंदोरच्या वेगवेगळ्या भागात जात होते. मी त्यांना विचारले “तुम्ही काय करत आहात?’ ते म्हणाला ‘मी अस्वच्छता शोधण्याचा प्रयत्न करत होतो, पण शक्य झाले नाही’. या शहराच्या यशाबद्दल हा दुसरा मोठा दाखला असेल असे मला वाटते ” असे हरदीपसिंग पुरी यांनी इंदोरने हा पुरस्कार जिंकल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांना सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा