गोल पोस्ट राष्ट्रीय इंदूर येथे विद्यार्थिनीची आत्महत्या

इंदूर येथे विद्यार्थिनीची आत्महत्या

इंदूर : वडिलांनी फोन काढून घेतल्यामुळे मुलीने आत्महत्या केल्याची घटना समोर येत आहे. आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव खुशी असून ती १०वी इयत्तेत शिकत होती. इंदूरच्या चंदन नगरमध्ये ही घटना घडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. परंतु याप्रकरणी पोलीस कोणत्याही प्रकारची तसदी घेत नसल्याचे चित्र समोर येत आहे.

बुधवारी रात्री उशीरापर्यंत खुशी मोबाइलवर गेम खेळत होती. म्हणून वडिलांनी तिच्या हातातून फोन काढून घेतला आणि झोपण्यास सांगितले. त्यानंतर खुशीचे आई-वडील आणि नातेवाईक कोणत्या एका कार्यक्रमासाठी बाहेर गेले तेव्हा खुशीने खोलीत फाशी घेवून आपले जीवन संपवले.
अधिक तपास पोलीस करीत आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version