नवी दिल्ली, 6 जुलै 2022: व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात कपात केल्यानंतर आता 48 दिवसांनी पुन्हा घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. इंडियन ऑइलच्या ताज्या अपडेटनुसार, आता तुम्हाला विनाअनुदानित 14.2 किलोच्या सिलिंडरसाठी 50 रुपये अधिक मोजावे लागतील. राजधानी दिल्लीत आता 14 किलोच्या सिलेंडरची किंमत 1003 रुपयांवरून 1053 रुपयांवर पोहोचली आहे.
यापूर्वी 19 मे रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत 3 रुपये 50 पैशांनी वाढ केली होती. त्याचबरोबर व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरातही आठ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
या शहरांमध्ये सिलिंडरने 1100 रुपयांचा टप्पा ओलांडला
• बिहार: सुपौल (रु. 1157.5), पाटणा (1151 रु.), भागलपूर (1150.5 रु.) आणि औरंगाबाद (1149.5 रु.)
• मध्य प्रदेश: भिंड (रु. ११३२), ग्वाल्हेर (रु. 1137) आणि मुरैना (1137 रु.)
• झारखंड: दुमका (रु. 1110.5) आणि रांची (1110.57 रु.)
• छत्तीसगड: कांकेर (रु. 1141) आणि रायपूर ( रु. 1124)
• उत्तर प्रदेश: सोनभद्र (रु. 1140)
1 वर्षात गॅस सिलेंडर 218.50 रुपयांनी महागला
1 जुलै 2021 रोजी दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 834.50 रुपये होती, जी आता 1053 रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच गेल्या वर्षभरात घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 218.50 रुपयांची वाढ झाली आहे. यावरील अनुदानही रद्द करण्यात आले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे