बंगळुरू,७ जुलै २०२० : जगभरात कोरोना महामारीचे थैमान अद्यालपही सुरूच आहे. कोरोना विषाणूला नियंत्रणात आणण्यासाठी अनेक देशांमध्ये टाळेबंदी करण्यात आली आहे. तर सध्या सर्व आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे शिक्षण, नोकरी किंवा अन्य कारणास्तव विदेशात गेलेले नागरिक तिथेच अडकून पडलेत.
पण भारतातील आघाडीच्या एका आयटी कंपनीने अमेरिकेत अडकलेल्या आपल्या कर्मचाऱ्यांना मायदेशी परत आणले आहे.इन्फोसिस लिमिटेड या आयटी कंपनीने अमेरिकेतील आपले ७६ कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय अशा २०६ जणांना विशेष विमानाने भारतात परत आणले आहे.
कंपनीने सॅन फ्रॅन्सिस्को इथून या कर्मचाऱ्यांना स्पेशल चार्टर्ड विमानाने बंगळुरूमध्ये आणले आहे. काही इन्फोसिसचे कर्मचारी व्हिसा संपल्यामुळे अमेरिकेत अडकले होते. कोरोनामुळे सर्व आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद आहेत.
अशावेळेस अमेरिकेअडकलेल्या आमच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा भारतात आणण्याचे आम्ही ठरवले. २०० पेक्षा जास्त जणांना आणण्यासाठी आम्ही स्पेशल चार्टर्ड विमानाची व्यवस्था केली.
ही ते माहिती देत असतानाच विमान बंगळुरूमध्ये पोहोचले होते.अशी पोस्ट कंपनीचे असोसिएट व्ही पी संजीव बोडे म्हणाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी