इनोव्हेशन नेक्स्ट, बोस्टन सायंटिफिकचे दुसरे रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट सेंटर आता भारतात….

पुणे,15 मार्च 2022: बोस्टन सायंटिफिक कॅार्पोरेशनच् दुसरे आरएनडी सेंटर आता भारतात पुणे येथे सुरु केले असून भारतातील बोस्टनचे हे दुसरे सेंटर आहे. ७०००० चौरस फूटात हे सेंटर पसरलेले असून त्यातून कार्डिओलॅाजी, कारिडियाक रिदम मॅनेजमेंट, एण्डोस्कोपी, न्यूरोमॅाड्यूलेशन तसेच इंजिनिअरींगच्या विविध प्रांतात उत्तमोत्तम कामगिरी करण्यास पाठिंबा देईल. या सेंटरचे उद्घाटन फिजिशियन वैज्ञानिक आणि नीती आयोगाचे सेवारत सदस्य डॅा. विनोद पॅाल, बोस्टन सायटिफिकचे उपाध्यक्ष, राल्फ कार्डिनल, संचालक संजीव पांड्या, व्यवस्थापकीय संचालक मनोज माधवन यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी बोलताना डॅा. पॅाल यांनी सांगितले की अशा सेंटरची आपल्याला जास्त गरज असून मेंडिकल क्षेत्रातली ही प्रगती नक्कीच सकारात्मक आहे. तुमच्या एनर्जीचा वापर सकारात्मक कारणांसाठी वापरण्याचे त्यांनी आवाहन केले आहे. विद्येच्या माहेरघरात तुम्हाला जास्त वाव असल्याचं त्यांनी नमूद केलं. कोरोना काळात अनेक प्रकारच्या वॅक्सीनमुळे भारत आता मेडिकल क्षेत्रात अग्रेसर असल्याचं सांगायला ते विसरले नाही. गोल्बलायझेशनच्या काळात असे सेंटर सुरु होणे ही आनंदाची गोष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं.

तसेच राल्फ कार्डिनल यांनी सांगितले की रुग्णांना सहाय्य करणारे संपूर्ण तंत्रज्ञानाने अवगत असणारे दुसरे अद्ययावत सेंटर असणार आहे. त्यामुळे भारताचे अनेक वैद्यकिय प्रश्न यामुंळे सुटणार असल्याचं त्यांनी सांगितले . तर बोस्टन सायटिंफिकमध्ये नवोन्मेष्काराला अधिक प्राधान्य देत असल्याचं व्यवस्थापकीय संचालक मनोज माधवन यांनी सांगितले.

भारताच्या प्रगतीचे बोस्टन रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट सेंटर हे प्रगतीचे पुढचे पाऊल म्हणावे लागेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी -तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा