आईएनएस गुलदार ही युद्धनौका लवकरच विजयदुर्ग बंदरात स्थिरावणार

24
INS Guldar Indian Navy Vijaydurg

सिंधुदुर्ग १८ फेब्रुवारी २०२५ : भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी आईएनएस गुलदार ही युद्धनौका लवकरच विजयदुर्ग बंदरात स्थिरावणार आहे.सिंधुदुर्गात वसलेल्या विजयदुर्ग बंदरात आयएनस गुलदार ही युद्धनौका सुरू होणार आहे. मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी यासाठी प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. विजयदुर्गवासीयांनी मंत्री नितेश राणे यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांना या नौकेला विजयदुर्ग बंदर आणण्यासाठी आवश्यक ते सर्व आदेश मुक्ती नितेश राणे यांना दिले होते. त्यांच्या या प्रयत्नाने ही नौकादुर्ग बंदर मिळवण्यासाठी यश आले.

भारतीय नौदलाचे आयएनएस गुलजार हे सक्षम युद्धनौका असून, सागरी संरक्षण, सामरिक सामर्थ्य आणि मानवतावादी सेवांचे एक प्रेरणादायी प्रतीक आहे. ही गुलदार ही नौका विजयदुर्ग बंदरात प्रवास करेल , यामुळे वीजयदुर्ग या ऐतिहासिक ठिकाणाचे महत्त्व आणखी वाढेल.यामुळे सिंधुर्ग पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. असे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले आहे.यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठा फायदा होणार आहे. नौकेचे स्थलांतर कर्नाटक येथील बंदरातून करण्यात येणार असून, पर्यटन महामंडळाने त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. लवकरच ही नौका विजयदुर्ग बंदरात दाखल होईल.भारतीय नौदलाच्या लँडिंग शिप टँकश्रेणीतील आईएनएस गुलदार हे जहाज, त्याच्या सामरिक क्षमतांमुळे, नौदलाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी, ऋतुजा घनवट

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा