तमाशे करण्यापेक्षा सरकारने मूळ प्रश्नाकडे लक्ष द्यावे

पुणे, ४ ऑक्टोबर २०२२ : काय तो खोका…., काय तो दसरा…. अन् काय तो मेळावा…..” अशा तमाशाकडे आम्हाला लक्ष देण्याची गरज वाटत नाही. असे तमाशे करण्यापेक्षा सरकारने मूळ प्रश्नाकडे लक्ष दिल्यास जनतेचा विश्वास मिळवला तरी काहीतरी केल्याचा आनंद वाटेल, ‘ अशी खोचक टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोलताना केली.

काँग्रेस मेळाव्यानिमित्त शनिवारी पुण्यात आले असता त्यांच्याशी बातचीत केली. पटोले यांनी आपल्या शैलीत दिलखुलास प्रश्नांना उत्तरे दिली.

शिवसेना सोडून शिंदे गटात सहभागी झालेले मंत्री संदीपान भुमरे यांनी खोके चर्चेवर बोलताना थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करीत गडाख यांना मंत्रिपद देताना कसे अन् किती खोके घेतले हे मी पाहिलेले आहे. या प्रश्नाच्या उत्तरात पटोले म्हणाले, की खोक्याच्या चर्चेने महाराष्ट्राची किती बदनामी झाली, हे साऱ्या जगाने पाहिले आहे. सत्तेत येताना राज्यपालांनीदेखील असंवैधानिक कसे काम केले, हेही पाहिलेले आहे.

‘एकला चलोच….’

राज्यात महाविकास आघाडीचा जन्म झाला तसेच समीकरण आगामी महापालिका निवडणुकीत दिसण्यासाठी काँग्रेसने विचार बदलला आहे. या प्रश्नाच्या उत्तरात पटोले यांनी पुन्हा ‘एकला चलो’ वर जोर दिला. आपण कोणाशी बोलणी करणार नसून कार्यकर्ते कामालाही लागले आहेत. पुणे महापालिकेत आमची काय ताकत आहे, हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही. कारण लोकांना कोण किती स्वप्ने दाखवतो, हे समजले आहे, असेही सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी – सुरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा