मुंबई, २३ ऑगस्ट २०२०: कोरोना विषाणूच्या रुग्णांना वाढीव देयकं आकारणाऱ्या खासगी रुग्णालयांकडून त्यांनी आकारलेल्या वाढीव रकमेच्या किमान ५ पट दंड वसूल करण्याचे स्पष्ट निर्देश राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.
या निर्णयाची तातडीनं अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीनं सर्व जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना याबद्दलचे लेखी आदेश पाठवण्यात आले आहेत. खासगी रुग्णालयांबद्दल वारंवार येणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन राज्यशासनानं हा निर्णय घेतला आहे.
आता तरी खासगी रुग्णालय कडून लूटमार होऊ येऊ नये. अशीच सामान्य नागरिकांना अपेक्षा असेल.
न्युज अनकट प्रतिनिधी