जगभरातील विमानतळांवरील कर्मचारी, व्यवस्थापन आणि हवाई वाहतूक नियंत्रणासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे.
कारण हवाई सेवांमध्ये सुधारणा, संरक्षण, मार्गांची निश्चिती, परिवहन आदी व्यवस्थेत आणखी सुधारणा करणे हा या दिवसाचा उद्देश होता.आज आपण याबाबत विचार करत आहोत कारण आज आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिन आहे..
७ डिसेंबर १९४४ रोजी शिकागोमध्ये आंतरराष्ट्रीय नागरी हवाई परिषद झाली होती. त्यानंतर १९९६ मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने आंतरराष्ट्रीय नागरी हवाई दिवस साजरा करण्याची घोषणा केली.
याच दिवशी क्वांटस एअरलाइन्सच्या विमानातील वैमानिक आणि क्रू सदस्यांनी शर्थीचे प्रयत्न करून ४४९ प्रवाशांचे प्राण वाचवले होते.
आयसीएओची स्थापना १९४४ रोजी नागरी विमान वाहतुकीच्या आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि समानता सुरक्षित करण्यासाठी केली गेली. या पालनाचे उद्दीष्ट सामाजिक व आर्थिक विकासामध्ये आंतरराष्ट्रीय नागरी विमानोड्डाणाचे महत्त्व जागरूकता निर्माण करणे आहे. हा दिवस आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीची कार्यक्षमता वाढविण्याच्या भूमिकेचे स्मरण करते. एटीसी, एअरपोर्ट मॅनेजमेन्ट व एअरलाईन्स यामधील लोकांसाठी हा दिवस जगभर साजरा करतात.