इंटरनॅशनल मदर अर्थ डे

आज सर्वत्र जगात इंटरनॅशनल मदर अर्थ डे साजरा केला जात आहे. इंटरनॅशनल मदर अर्थ डे २००९ पासून सुरुवात झाला. यामागचे कारण असे आहे की पृथ्वीतलावर राहणाऱ्या प्रत्येक सजीव प्राणी, कीटक, पक्षी आणि मानव हे एकाच ग्रहावर राहत आहेत म्हणजेच हे सर्वांसाठी एक घर आहे या अनुषंगाने पृथ्वीला मदर असे संबोधत हा दिवस मदर अर्थ डे म्हणून साजरा केला जातो.

निसर्गापासून मानव दुरावत चाललेला आहे. निसर्गाशी असलेले मानवाचे नाते पुन्हा घट्ट करण्याचा ह्या दिवसाचा हेतू आहे. माणसाने आपल्या बुद्धीच्या जोरावर भरपूर प्रगती केली परंतु निसर्गाच्या पुढे तो जाऊ शकत नाही हे आजही सत्य आहे त्यामुळे निसर्गाशी असलेले आपले नाते लक्षत राहावे म्हणून आजचा दिवस हा मदर अर्थ डे म्हणून साजरा केला जात आहे.

सर्व यु एन सदस्य देशांनी मिळून हा ठराव मान्य केला व २२ एप्रिल हा दिवस मदर अर्थ डे म्हणून साजरा करण्याचे ठरवले. ग्लोबल वार्मिंग आणि हवामान संकटाच्या भीतीमुळे लोकांना निसर्गाचे महत्त्व पटवून दिले आहे. निसर्गामध्ये संतुलन राखण्याचे महत्त्व लोकांनाही ठाऊक झाले आहे. निसर्गाच्या महत्त्वविषयी बोलण्यासाठी जगभरातील अनेक देशांनी कित्येक दिवसांचा अवलंब केला आहे. म्हणूनच, मानवाचे आणि निसर्गाचे महत्त्व लक्षात ठेवण्यासाठी दरवर्षी हा दिन साजरा केला जातो.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा