२५ सप्टेंबर हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय फार्मासिस्ट दिवस म्हणून साजरा केला जातो. इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशन (FIP) या संस्थेच्या पुढाकाराने आणि सन २००० मध्ये इस्तंबूल येथे झालेल्या परिषदेत मान्यता मिळाल्यानंतर हा उपक्रम सुरू झाला. या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे फार्मसीचे महत्त्व अधोरेखित करणे आणि आरोग्य क्षेत्रातील फार्मासिस्टचे योगदान जनतेपर्यंत पोहोचवणे हा आहे.
दरवर्षीप्रमाणेच यंदाही श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, चोपडा येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यंदाचा विषय “थिंक हेल्थ, थिंक फार्मसीस्ट” असा होता. या विषयाला अनुसरून एक भव्य रॅली आयोजित करण्यात आली. रॅलीची सुरुवात महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या मेन गेटवरून संस्थेच्या सचिव आदरणीय ताईसाहेब डॉ. स्मिता संदीप पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून झाली. विद्यार्थ्यांनी आरोग्य विषयक घोषणाबाजी करून नागरिकांचे लक्ष वेधले.
रॅलीची सांगता चोपडा बस स्थानकापासून परतून महाविद्यालयात झाली. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील, उपाध्यक्ष आशाताई पाटील, सचिव ताईसाहेब डॉ. स्मिता पाटील यांनी उपस्थित राहून कौतुक केले. प्राचार्य डॉ. गौतम वडनेरे यांनी संपूर्ण रॅलीत सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. रॅलीचे प्रमुख आयोजक फार्मासुटिक्स विभाग प्रमुख डॉ. भरत जैन होते.
या उपक्रमात प्रबंधक श्री. प्रफुल्ल मोरे, विभाग प्रमुख डॉ. संदीप पवार, डॉ. मोहम्मद रागीब उस्मान, डॉ. कुंदन पाटील, सौ. नलिनी मोरे, डॉ. किरण बाविस्कर, श्री. पियुष चव्हाण, शैक्षणिक विभाग प्रमुख डॉ. तन्वीर शेख यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले. फार्मासिस्ट दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे औषधांच्या सुरक्षित वापरासंबंधी जनजागृती करणे, औषधांची गुणवत्ता सुनिश्चित करणे आणि फार्मसी क्षेत्रातील योगदानाला योग्य सन्मान मिळवून देणे हा आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी आत्माराम पाटील













































