नवी दिल्ली, ४ नोव्हेंबर २०२० : अखिल भारतीय आयुर्वेद संस्था आणि पश्चिम सिडनी विद्यापीठ यांनी संयुक्त पणे दूर दृश्य प्रणालीमार्फत एका वेबीनारचं आयोजन केलं आहे. या वेबीनारचं उद्घाटन आयुष मंत्रालयाचे राज्य मंत्री श्रीपाद नाईक आणि आर्ट ऑफ लिविंग चे संस्थापक श्री श्री रवीशंकर यांच्या हस्ते उद्या होणार आहे.
मानसिक योग आणि आयुर्वेद उपचार पद्धती असा या वेबीनारचा विषय आहे. योग आणि आयुर्वेद विषयावरील संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर चालना मिळावी असा या मागचा उद्देश आहे. या वेबीनारमुळे जगाच्या अनेक ठिकाणहून येणाऱ्या संशोधकांमध्ये योग आणि आयुर्वेद विषयावरील अनेक मुद्यांची चर्चा तसेच या विषयाच्या भवितव्याबद्दल चर्चा होईल.
या वेबीनारच्या आयोजनामुळे योग आणि आयुर्वेद मधील पुढील संशोधनाला चालना मिळेल. तसेच सर्वसामान्यांमध्ये योग आणि आयुर्वेदाची मानसिक स्वास्थ्यासाठी गरज याबद्दल जागरूकता निर्माण व्हायला मदत होणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी