‘एकल वृद्धांच्या समस्या’ या विषयावर रविवारी पुण्यात मुलाखतीचे आयोजन

7

पुणे , १८ जानेवारी २०२३ : करम प्रतिष्ठान आणि रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे ‘एकल वृद्धांच्या समस्या’ या विषयावर गौरी धुमाळ यांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर आणि करम प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण कटककर यांनी दिली.

प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण कटककर म्हणाले की, हा कार्यक्रम २२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता पत्रकार भवन येथे होणार असून, धुमाळ यांच्याशी रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर आणि प्रा. प्रज्ञा महाजन संवाद साधणार आहेत. यावेळी मैथिली आडकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे. यासोबतच आनंदी केअर सेंटरच्या अध्यक्षा रोहिणी ताकवले यांचा या कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात येणार आहे,

तर कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात करम ‘आभा’ हे निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. यात कांचन सावंत, मिलिंद छत्रे, सुजाता पवार, प्राजक्ता पटवर्धन, चंचल काळे, स्वाती यादव, वासंती वैद्य, वैजयंती विंझे-आपटे, डॉ. दाक्षायणी पंडित, अपर्णा डोळे, प्रतिभा पवार, वैशाली माळी यांचा सहभाग असणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा