दारूच्या नशेत बापने मुलावर झाडल्या चार गोळ्या…..

दिनाजपूर, १९ फेब्रुवरी २०२१: दारू पियुन नशेत वडिलांनी चार वर्षांच्या मुलाला गोळी घालून ठार मारण्याचा आरोप समोर आला आहे. ही घटना उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील रायगंजच्या झटकाईया गावची आहे. साहिल असे मृत मुलाचे नाव आहे. घटनेनंतर आरोपी वडील नस्तर अली फरार झाला.

स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार ही घटना बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. असा आरोप केला जात आहे की त्याच्या पत्नीने अनेकदा नस्तर अलीशी भांडण केले. हुंड्याच्या मागणीसाठी नस्तर अली पत्नीवर अत्याचार करायचा. बुधवारीदेखील नस्तर अली घरात दारूच्या नशेत आला आणि त्रास देऊ लागला.

तेवढ्यातच नस्तर अलीने आपल्या चार वर्षाच्या मुलगा साहिलवर गोळ्या घातल्या. घटनेनंतर स्थानिक लोकांनी मुलाला सावरले आणि त्याला रायगंज मेडिकल कॉलेज व इस्पितळात नेले, तेथे साहिलचा थोड्या वेळाने मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेचा तपास पोलिस करत आहेत. पोलिस आरोपी नस्तर अलीचा शोध घेत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखील जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा