गेल्या चार दिवसात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ३.१ लाख कोटी रुपयांची वाढ

मुंबई, १९ नोव्हेंबर २०२०: कोरोना संकट असतानाही शेअर बाजार सातत्यानं नवनवीन विक्रम गाठत आहे. गेल्या चार ट्रेडिंग सत्रांमध्ये सेन्सेक्सने ८८३ अंकांची कमालीची झेप घेतली असून गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ३.१ लाख कोटी रुपयांची वाढ झालीय.

सेन्सेक्स ‘ऑल टाइम हाय’ वर

महत्त्वाचं म्हणजे सेन्सेक्स बुधवारी सर्व-उच्च पातळीवर पोहोचला. ट्रेडिंग दरम्यान सेन्सेक्स ४४,२१५ अंकांच्या उच्चांकावर पोहोचला. त्याचबरोबर निफ्टी १२,९४८ अंकांच्या पातळीवर पोहोचला. ट्रेडिंग संपल्यानंतर सेन्सेक्स २२८ अंकांच्या वाढीसह ४४,१८० अंकांवर बंद झाला. निफ्टीविषयी बोलतांना तो ६४ अंकांनी वाढून १२,९४० अंकांवर पोहोचला.

केवळ चार ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स ८८३ अंकांनी वधारला आणि बीएसईतील सूचीबद्ध कंपन्यांचं बाजार भांडवल १७१.४ लाख कोटी रुपयांवर पोहोचलं. तीन दिवसांपूर्वी ते १६८.३ लाख कोटी रुपये होतं. सेन्सेक्समध्ये या महिन्यात आतापर्यंत ११ टक्क्यांची जबरदस्त वाढ झाली आहे.

बुधवारी किमान १७२ कंपन्यांनी ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळी गाठली. यात एचडीएफसी, एस्कॉर्ट, अशोक लेलँड, महिंद्रा आणि महिंद्रा इ. यातील सुमारे एक चतुर्थांश कंपन्या त्यांच्या सर्व-उच्च पातळीवर कार्यरत आहेत.

परदेशी गुंतवणूकदारांनी केलेली प्रचंड गुंतवणूक

आजकाल परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (एफपीआय) स्टॉक मार्केटमध्ये प्रचंड गुंतवणूक करीत आहेत. ऑक्टोबर मध्ये त्यांनी जेवढी गुंतवणूक केली होती ते सर्व पार करत त्यांनी नोव्हेंबरच्या सत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. नोव्हेंबरमध्ये एफपीआयनं सुमारे ३६,७८६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे, त्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये १९,५४१ कोटी रुपये होती. यापूर्वी सप्टेंबरमध्ये एफपीआयनं सेन्सेक्स मधून सुमारे ७,७८३ कोटी रुपये काढले होते.

आज बाजारात शिल्लक घसरण

आज सकाळी ट्रेडिंग सुरू झाल्यानंतर ९.३० वाचता सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला होता तर निफ्टी ३५ अंकांनी घसरला होता. लागोपाठ चार दिवस बाजारात होत असणारी वाढ पाहता गुंतवणूकदारांनी आज आपला नफा काढून घेण्याचा प्रयत्न केला असावा त्यामुळे आज बाजारात किंचित घसरण दिसून येत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा