आय ओ ए ने भारतीय अैथलीट्सच्या सहभागाची साजरी केली शंभरी ; सादर केला नविन लोगो

नवी दिल्ली, ७ जुलै २०२० : भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (आयओए) सोमवारी ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय अैथलीट्सच्या सहभागाची १०० वर्षे साजरी करण्यासाठी एक नवीन ब्रँडिंग आणि व्हिज्युअल ओळख म्हणून असोसिएशनचा नविन लोगो सादर केला. आयओएचे अध्यक्ष नरिंदर ध्रुव बत्रा आणि आयओएचे सरचिटणीस राजीव मेहता यांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, मंडळाचा हा नवा लोगो हा आपल्या देशातील ओळख आणि खेळामधील त्यांच्या मूल्यांचे प्रतीक आहे.


“भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचा नवीन लोगो हा आपल्या देशातील अस्मिता आणि खेळामधील आमच्या मूल्यांचे प्रतीक आहे. आपल्या अैथलिटना टीम इंडियाचे प्रतिनिधीत्व करून जागतिक मंचावर जाताना अभिमान वाटावा अशी त्याची रचना आहे, ही नवी ओळख तिरंग्याचा अभिमानपूर्ण उत्सव आहे , अभिमान, सन्मान हे आयुष्यभर आमच्या क्रीडापटूंनी जपले आहे. तशीच त्यांचे कठोर परिश्रम एकता, मैत्री आणि गुणवत्तेची मूल्ये, आयओएने कायम ठेवली आहेत,

बत्रा आणि मेहता म्हणाले की, नवीन ऑलिम्पिक लोगोला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) मान्यता दिली आहे आणि आयओए १५ ऑगस्ट रोजी लोगो लॉन्चिंग कार्यक्रम आयोजित करण्याची योजना आखत आहे. पूर्वीचा संस्थात्मक लोगो ज्याने प्रेरणा घेतली होती भारतीय उपखंडात ब्रिटीश राजांच्या काळात दत्तक घेण्यात आलेल्या ‘स्टार ऑफ इंडिया’ ची , त्याचा वापर आयओएच्या स्थापनेपासून आतापर्यंत केला जात आहे.

“आपल्या देशातील प्रतिनिधींनी जगाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवत असतानाचा हा प्रसंग पाहण्यासारखा दुसरा आनंद नसतो कारण हे दृश्य पाहताना संपूर्ण देश एकत्र असतो. जेव्हा आमचे खेळाडू खेळाच्या मैदानात किंवा व्यासपीठावर जातात किंवा भारतीय ध्वज फडकावत विजय मिळवतात तेव्हा हाच क्षण आहे जो आमच्यासाठी अभिमानाचा आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा