दुबई, २१ सप्टेंबर २०२०ः रविवारी झालेल्या देली कैपीटल विरुद्ध कींग्स इलेवेन पंजाब या सामन्यात चुकीच्या अंपायरिंगच्या मुद्द्याला वेगळे वळण येत आहे .या प्रकरणात आता कींग्स इलेवेन पंजाब संघाची संघमालक आणि अभिनेत्री प्रीती झिंटा हिने संताप व्यक्त केला आहे. तिने ट्वीट करत बीसीसीआईला प्रश्न विचारला आहे. ती म्हणाली, असे तंत्रज्ञान काय कामाचे ज्यात चुकीचे निर्णय थांबवता येत नाहीत.
यासोबतच तिने बीसीसीआयला नवीन नियम लागू करण्याची मागणी केली आहे. रविवारी झालेला सामना हा टाय झाला होता. त्यानंतर सुपर ओवर मध्ये देल्ही कॅपीटल संघाला विजय मिळाला होता. परंतु त्या आधी झालेल्या १९ व्या ओवरमध्ये पंजाब संघाला एक रन न देता तो शॉर्ट आहे असे सांगत चुकीचा निर्णय दिला गेला होता.
प्रीती झिंटा सोशल मीडिया वर म्हणाली , “मी पूर्ण उत्साहासोबत कोरोना महामारी असताना सुद्धा सामने पाहण्यासाठी यूएईला आली आहे. हसत हसत ६ दिवस क्वारंटीन मध्ये राहिले आणि ५ वेळा कोव्हीड १९ चाचणी करून घेतली, परंतु या एक रनमुळे मला चांगलाच धक्का बसला आहे. आणि अश्या तंत्रज्ञानाचा काय फायदा ज्याचा उपयोग नाही केला जाऊ शकत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अंकुश ढावरे