दुबई, २८ सप्टेंबर २०२०: राजस्थान रॉयल्स संघाचा अष्टपैलू खेळाडू राहुल तेवतीया याने रविवारी झालेल्या शारजाहाच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२० च्या ९ व्या सामन्यात अविश्वसनीय फलंदाजी करत पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघाला विजय मिळवून दिला. त्याने एका षटकात शनन कोट्रेल याला ५ षटकार मारत सामना जिंकला. परंतु खूप कमी लोकांना ही गोष्ट माहीत असेल की, मागच्या आयपीएल सत्रामध्ये कोणीतरी आपलेही कौतुक करावे अशी आशा त्याने व्यक्त केली होती. परंतु कोणीच त्याचे कौतुक केले नाही.
बोलतातना प्रत्येकाची वेळ बदलते. असंच काहीतरी झालं आणि याच सिजन मध्ये ते आपल्याला प्रत्यक्षात पाहायला ही मिळालं. आयपीएल २०२० मध्ये आपल्या एका खेळीमुळे त्याचे सर्वांकडून अभिनंदन केले गेले. आणि याचमुळे पराभवाच्या तोंडातून सामना बाहेर काढत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. कालपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओ मध्ये तेवतिया हा दिल्ली कॅपिटल संघामधून खेळत होता. आणि तो कोच रिकी पाँटिंग याच्याकडून कौतुकाची थाप मिळावी याची वाट पाहत असतो आणि त्याला ती नाही मिळत.
दिल्ली कॅपिटल संघाकडून खेळताना राहुल तेवतीया याने कोच रिकी पाँटिंग याला म्हंटले होते की, मुंबई इंडियन्स विरुद्ध झालेल्या सामन्यात त्यानेही ४ झेल घेतले होते. सामना झाल्यानंतर रिकी पाँटिंग यांनी रिशभ पंत, शिखर धवन, कोलिन इंग्रम आणि संघातल्या अन्य गोलंदाजांचे कौतुक केले होते. तिथेच राहुल तेवातिया कोच पाँटिंगला ही गोष्ट म्हणाला होता.
त्यानंतर कोच पाँटिंगने मस्करी मध्ये संपूर्ण संघाला म्हंटले होते, “तेवतीया ने ४ झेल घेतले आणि तो म्हणतोय की मी त्याचे कौतुक करावे” यानंतर अक्षर पटेल याने तेवतियाला म्हंटले होते, “स्वतःच्या तोंडाने स्वतःसाठी असं कोण बोलत. त्यावर तेवतिया म्हणाला होता. “आपल्या हक्कासाठी लढणार”. यंदा असं काही म्हणायची त्याला गरजच भासली नाही. त्याने जे केले ते कौतुकास्पद होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे