IPL: धोनीच्या धुरंधरांनी मारली बाजी, CSK चा RCB वर 6 गडी राखून विजय

शारजाम, 25 सप्टेंबर 2021: इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 14 व्या हंगामातील 35 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चा 6 विकेट्सनं पराभव केला. शारजामध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात आरसीबीला प्रथम फलंदाजीचं आमंत्रण मिळालं. त्यांनी 20 षटकांत 6 गडी गमावून 156 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्सनं 157 धावांचौ लक्ष्य 18.1 षटकांत 6 गडी गमावून पूर्ण केलं.

या विजयासह चेन्नईला 14 गुण मिळाले असून गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचले आहे. त्यांनी आतापर्यंत 9 पैकी 7 सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर आरसीबीचा हा चौथा पराभव आहे. आरसीबी 9 सामन्यांत 10 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

आरसीबीकडून 157 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऋतुराज गायकवाड आणि फाफ डु प्लेसिसने चेन्नईला झटपट सुरुवात करून दिली. दोघांनी 8.1 षटकांत 71 धावा जोडल्या. त्यानंतर युझवेंद्र चहलने ही भागीदारी मोडली आणि ऋतुराज ला डावाच्या 9 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर कोहलीच्या हाती झेल दिला.

ऋतुराजने 26 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं 38 धावा केल्या. पुढच्या षटकात नवदीप सैनीनं मॅक्सवेलच्या चेंडूवर डु प्लेसिसचा झेल घेतला. त्यानं 26 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार मारून 31 धावा केल्या. अंबाती रायुडूनं पुढच्याच चेंडूवर पुन्हा चौकार लगावला. मोईन अनीनं चहलच्या अतिरिक्त कव्हरवर शानदार षटकार ठोकला. त्यानं वनिंदू हसरंगावरही षटकार ठोकला.

14 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हर्षल पटेलने मोईनला विराट च्या हाती झेलबाद केलं. त्यानं 18 चेंडूत 2 षटकारांच्या मदतीनं 23 धावा केल्या. मग हर्षलनेही रायडूला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. हर्षलच्या डावाच्या 16 व्या षटकाच्या सुरुवातीच्या दोन्ही चेंडूंवर रायुडूने चौकार लगावले पण चौथ्या चेंडूवर त्याला डिव्हिलियर्सने झेलबाद केलं. त्याने 22 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 32 धावा केल्या. आरसीबीकडून हर्षल पटेलने 2 तर चहल आणि मॅक्सवेलने 1-1 बळी मिळवला.

अशी होती आरसीबीची खेळी

तत्पूर्वी, विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी शारजाच्या मैदानावर जोरदार खेळ दाखवला आणि दोघांनी 111 धावांची सलामी भागीदारी केली. असे असूनही आरसीबी संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. विराटने त्याच्या 53 धावांच्या खेळीत 6 चौकार आणि 1 षटकार मारला तर देवदत्तने 50 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांसह 70 धावांचे योगदान दिले.
खरेदी

एबी डिव्हिलियर्सने शार्दुल ठाकूरच्या डावातील 17 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवरही षटकार ठोकला, पण शार्दुलने त्याच षटकातील शेवटच्या 2 चेंडूंमध्ये 2 गडी बाद केले. शार्दुलने एबी (12) ला 5 व्या चेंडूवर रैनाकडे झेलबाद केले आणि त्यानंतरच्याच चेंडूवर देवदत्तचा डाव संपवला.

आरसीबीसाठी पदार्पण करणारा टीम डेव्हिड फार काही करू शकला नाही आणि अवघ्या 1 धाव करून पॅव्हेलियनमध्ये परतला. ब्राव्होने डावाच्या शेवटच्या षटकात 2 गडी बाद केले. त्याने ग्लेन मॅक्सवेलला (11) दुसऱ्या चेंडूवर जडेजाच्या हाती झेल दिला आणि नंतर हर्षल पटेलला (3) रैनाने शेवटच्या चेंडूवर झेलबाद केले. चेन्नईकडून ड्वेन ब्राव्होने 3 आणि वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने 2 तर दीपक चाहरने 1 विकेट घेतली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा