नवी दिल्ली १९ जून २०२३: देशाची गुप्तहेर संस्था रॉ चे प्रमुख म्हणून आयपीएस अधिकारी रवी सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आलीय. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने आज, वरिष्ठ आयपीएस अधिकारी रवी सिन्हा यांची रॉ चे प्रमुख म्हणून दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी मान्यता दिली. रवी सिन्हा हे छत्तीसगड केडरचे १९९८ बॅचचे अधिकारी आहेत. सध्या ते कॅबिनेट सचिवालयाचे विशेष सचिव म्हणून काम पाहतायत. ते आता रॉ प्रमुख गोयल यांची जागा घेतील. गोयल यांचा कार्यकाळ ३० जून रोजी संपतोय.
सध्याचे रॉ प्रमुख गोयल यांच्या कार्यकाळात, पाकिस्तानमधील बालाकोटमध्ये एअरस्ट्राइक करण्यात आली, ही कारवाई मोठी मानली जाते. आताचे नवे रॉ प्रमुख रवी सिन्हा हे बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील आहेत. रवी सिन्हा यांनी दिल्लीच्या सेंट स्टिफन्स कॉलेजमध्ये शिक्षण घेतले असुन १९८८ मध्ये युपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन भारतीय पोलीस सेवेत ते दाखल झाले.
न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर