iQOO 9 Series, 12 फेब्रुवारी 2022: iQOO सीरीज स्मार्टफोन गेमिंगसाठी ओळखले जातात. हा ब्रँड फक्त चीनी स्मार्टफोन निर्माता Vivo अंतर्गत येतो. कंपनी आता भारतात आपला फ्लॅगशिप iQOO 9 लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
iQOO 9 सिरीज अंतर्गत, iQOO 9, iQOO 9 Pro आणि iQOO 9 SE येतात. हे स्मार्टफोन्स चीनमध्ये गेल्या वर्षी लॉन्च करण्यात आले होते. कंपनी भारतात iQOO 9 मध्ये काय बदल करणार आहे हे स्पष्ट नाही. पण या महिन्यात हा फोन भारतात येणार हे निश्चित आहे.
iQOO इंडियाने आपल्या ट्विटरवर या स्मार्टफोनचा टीझर जारी केला आहे. परंतु भारतात लॉन्चची तारीख माहित नाही. इथं फक्त Coming Soon असं लिहिलं आहे. यावरून हे स्पष्ट झाले आहे की या महिन्यात iQOO 9 सीरीज भारतात लॉन्च केली जाऊ शकते.
iQOO 9 सीरीजबद्दल बोलायचे तर, त्याच्या टॉप व्हेरियंटमध्ये म्हणजे iQOO 9 Pro मध्ये टॉप नॉच हार्डवेअर देण्यात आलौ आहे. त्याची डिझाईन देखील खूप वेगळी आहे आणि कंपनीने गेमिंग प्रेमींना देखील लक्ष्य केले आहे.
Qualcomm Snapdragon 8 Gen 1 चिपसेट iQOO 9 Pro च्या चायनीज वेरिएंटमध्ये देण्यात आला आहे. यात 2k डिस्प्ले आहे आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. मात्र, रिपोर्टनुसार, भारतात 2K डिस्प्लेऐवजी फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले दिला जाईल.
डिस्प्ले व्यतिरिक्त कॅमेऱ्यात फारसा बदल अपेक्षित नाही. या स्मार्टफोनमध्ये 12GB सह 512GB पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळेल. त्याची बॅटरी 4,700mAh आहे आणि यासह 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध असेल.
iQOO 9 Pro मध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 50 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड, 16 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सिंग कॅमेरा आहे. सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
iQOO 9 बद्दल बोलायचं झालं तर, या स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा फुल HD AMOLED डिस्प्ले असेल. येथे तुम्हाला 120Hz रिफ्रेश रेटचा सपोर्ट देखील मिळेल.
क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 888+ चिपसेट iQOO 9 मध्ये देण्यात आला आहे, जो गेल्या वर्षीचा फ्लॅगशिप प्रोसेसर आहे. या स्मार्टफोनमध्ये 12GB रॅमसह 512GB इंटरनल स्टोरेज आहे. या स्मार्टफोनची बॅटरी 4,350mAh आहे. यात 120W फास्ट चार्ज सपोर्ट देखील आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे