सरकार बलात्काऱ्यांना पाठीशी घालतय का? अभाविपचा प्रश्न

मालेगाव, २ जानेवारी २०२१: अभाविप मालेगाव कडून ठाकरे सरकारला दिशा कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी करून बलात्काऱ्यांना दिशा कायद्याच्या द्वारे कडक शासन करावे अशी मागणी केली.
आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मालेगावच्या वतीने रायगड जिल्ह्यातील पेण या ठिकाणी ३ वर्षाच्या एक चिमुर्डी वर बलात्कार करून ठार मारण्यात आले तसेच, औरंगाबाद येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख याने एका तरुणीला नौकरीचे अमिश दाखवून विनयभंग केला आहे. त्याच्या विरोधात पीडित तरुणीने गुन्हा दाखल करून ४ दिवस झाले तरी मात्र महाराष्ट्र सरकारच्या वतीने कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. एका बाजूला सरकार विरोधी बोलले म्हणून बेकायदेशीर अटक केली जाते तर दुसऱ्या बाजूला अमानवीय कृत्य करणाऱ्याला पाठीशी घातले जात आहे.
म्हणून अभाविप मालेगावकडून सटाणा नाका येथे सरकार चा निषेध करण्यात आला व नराधमांना दिशा कायद्यानुसार शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी अभाविप मालेगाव जिल्हा सहसंयोजक कामेश गायकवाड, वसतिगृह प्रमुख शिवदास सूर्यवंशी, शहर सहमंत्री तन्वी वैद्य, भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस सुनील शेलार, अविनाश ठोरकर, दिशांत पैठणकर, दीपक उपाध्याय, नंदकिशोर अहिरे आदी कार्यकर्त्यांसह मालेगाव शहर संघटनमंत्री सचिन लांबूटे उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा