पुणे, २२ ऑक्टोबर २०२२: काही गोष्टी जवळून पाहताना वेगळ्या भासतात आणि दुरून पाहिल्या तर अगदीच अपरिचित, हे आपण प्रत्येकाने अनेकदा अनुभवलं असेल. मग ती माणसं असो किंवा काही वस्तू. काही माणसं तर फोटो मधे वेगळी आणि प्रत्यक्षात वेगळी दिसतात पण हेच तुम्ही कधी कुठल्या वन्यजिवासोबत झालेलं पाहिलय का? तूम्ही मुंगीचा क्लोज अप फोटो कधी बघितला आहे का?
लिथुनियाच्या फोटोग्राफर युजेनिजस कॅवलियुस्कस याने चक्क मुंगीचा जवळून फोटो काढला आहे. एक लहानशी मुंगी एखाद्या भव्य अश्या राक्षसा सारखी दिसत आहे. निकॉन स्मॉल वर्ल्ड फोटो मायक्रोग्राफिक या स्पर्धेत युजेनिजसने हा फोटो पाठवला होता. या स्पर्धेची खासियत अशी की यात तुम्हाला जे उघड्या स्पष्ट डोळ्यांनी दिसत नाही त्याचे फोटो काढावे लागतात.
सर्वांचे लक्ष वेधले जाईल असा हा फोटो
काही लोकांना हा फोटो पाहून गेम ऑफ थ्रोन्स चा ड्रॅगन आठवला तर काहीना एखाद्या हॉरर चित्रपटाच्या भूताची आठवण झाली. टॉप ६० फोटोज् मधे याची निवड करण्यात आली आणि या फोटोग्राफर युजेनिजस कॅवलियुस्कस ला बक्षीस देण्यात आलं.
न्यूज अनकट प्रतिनिधि : केतकी कालेकर