व्हिएन्ना, ४ नोव्हेंबर २०२०: इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेव्हंट (इसिस) यांनी मंगळवारी व्हिएन्ना हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. काल ऑस्ट्रियामधील व्हिएन्ना शहरात घडलेल्या या दहशतवादी घटनेत चार लोक ठार तर किमान २२ जण जखमी झाले.
अतिरेकी इस्लामिक गटाशी संबंधित अमाक वृत्तसंस्थेनं असं निवेदन केलं आहे की व्हिएन्ना हल्ल्याचा शूटर ज्याला त्यांनी अबू दुजाना अल-अबानी (अल्बेनियन) म्हटलं होतं तो खिलाफतचा सैनिक होता.
दुसरीकडं, ऑस्ट्रियाच्या अधिकाऱ्यांनी उत्तर मेसेडोनियामधील अल्बानियन कुझतीम फेजुलै अशी अपराध्यांची ओळख पटवली आहे. एप्रिल २०१९ मध्ये त्याला सीरियामध्ये इसिसमध्ये सामील होण्याच्या इच्छेबद्दल २२ महिन्यांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती, परंतु त्याच वर्षी डिसेंबरमध्ये त्याला लवकर सुटका देखील देण्यात आली होती.
पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह जगातील अनेक प्रमुखांनी व्हिएन्नामध्ये झालेल्या या हल्ल्याचा निषेध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. पीएम मोदी यांनी ट्वीट केलं आहे की, ऑस्ट्रियामध्ये भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळं त्यांना खूप दु:ख झालं आहे. पीएम मोदी म्हणाले आहेत की या संकटाच्या वेळी भारत ऑस्ट्रियाबरोबर आहे. या हल्ल्यातील पीडित आणि कुटूंबियांबद्दल आम्ही संवेदना व्यक्त करतो.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे