इस्लामीक स्टेटचा मोर्चा अफगाणिस्थानकडे

नवी दिल्ली (वृत्त संस्था): सीरियामध्ये अमेरिकेच्या कारवाईत इसिसचा म्होरक्या अबू बाकर अल बगदादी मारला गेला. त्यानंतर इस्लामिक स्टेट आता अफगाणिस्तानमध्ये आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे इस्लामिक स्टेटने अफगाणिस्तानमध्ये आपली पाळेमुळे घट्ट केली तर भारत, पाकिस्तान, रशिया आणि चीनला धोका आहे असे इराणचे परराष्ट्र मंत्री जावद झरीफ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
तसेच इसिसमुळे उदभवणाऱ्या नव्या संकटाचा सामना करण्यासाठी या सर्व देशांनी एकत्र येणे आवश्यक आहे असे झरीफ यांनी सांगितले.

झारीफ पुढे म्हणाले की, इसिसचे पुनर्जीवन भारत, इराण आणि पाकिस्तान तिघांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. सीरिया आणि इराकमध्ये पाडाव झाल्यामुळे इसिस आता आपला तळ अफगाणिस्तानमध्ये हलवत असल्याची माहिती आंतराष्ट्रीय सूत्रांकडून देण्यात येत आहे. तसेच अफगाणिस्तानातील एका ठराविक भूप्रदेशातून इसिसच्या कारवाया सुरु आहेत. प्रत्येकासाठी हा चिंतेचा विषय आहे. यामुळे कुठल्या एका देशाला नव्हे संपूर्ण प्रदेशाला धोका आहे” असे जावेद झारीफ यांनी सांगितले.

अफगाणिस्तानमधील तळावरुन इसिसचे दहशतवादी तजाकिस्तान आणि उझबेकिस्तानमध्ये कारवाया करत असल्याची माहिती उपलब्ध आहे, असे झारीफ यांनी सांगितले.
इसिसबद्दल गुप्तचरांकडून मिळालेली ही माहिती गंभीर बाब आहे. आम्ही याबद्दल भारत, पाकिस्तान, रशिया आणि चीनच्या संपर्कात आहोत. दहशतवादाविरुद्धच्या या लढाईत आपण सर्व एकत्र येऊ शकतो असे झारीफ म्हणाले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा